शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या टॅरिफ धोरणावर आज रात्री फैसला; ट्रम्प यांच्याविरोधात निकाल गेल्यास काय घडू शकतं?
2
मैत्री मैत्रीच्या ठिकाणी...! युद्धात इराणला साथ देणार नाही चीन? कारण काय?
3
धक्कादायक ! नागपुरात बाप झाला सैतान,पत्नीकडे ताबा जाऊ नये म्हणून पोटच्या मुलीची हत्या
4
"JJD हा लालूंचा खरा पक्ष"; राजद विलीनीकरणावर तेजप्रताप यांची तेजस्वींना थेट ऑफर
5
Petrol कार्सच्या तुलनेत Diesel कार्स जास्त मायलेज का देतात? जाणून घ्या यामागील विज्ञान...
6
बांगलादेशचा आडमुठेपणा! भारतात टी-२० वर्ल्डकप खेळण्यास नकार; आता आयसीसीकडे आहेत ३ पर्याय!
7
IND vs NZ : हर्षित राणानं ऑफ स्टंप उडवत डेवॉन कॉन्वेचा केला करेक्ट कार्यक्रम! गंभीरने अशी दिली दाद
8
मुस्लिमबहुल प्रभागांत रंगणार काँग्रेस-एमआयएम सामना! १३ जागांसाठी काँग्रेसची धडपड, शिंदेसेना चारही जागा राखणार?
9
डोंबिवलीत भाजपा अन् शिंदेसेनेत जोरदार राडा; ५ जणांना अटक, जखमींवर रुग्णालयात उपचार
10
Video - ई-रिक्षातील तरुणाचं अश्लील कृत्य; रणरागिणीने रस्त्यावरच घडवली चांगलीच अद्दल
11
"विना परवाना शस्त्र वाटणार, ज्याला हवं त्याने..."; योगी सरकारच्या मंत्र्याचं धक्कादायक विधान
12
भारतीय पासपोर्टला मिळाली ताकद, आता ५५ देशांमध्ये व्हिसा-मुक्त प्रवेशाची परवानगी
13
‘तातडीने इराण सोडा, मिळेल त्या वाहनाने बाहेर पडा’, भारतीय दूतावासाकडून आपल्या नागरिकांना सूचना
14
रॉकेट बनलाय हा पेनी स्टॉक, ५ दिवसांत दिला ६१% परतावा; फक्त २० रुपयांवर भाव! तुमच्याकडे आहे का?
15
भारतातील एक अनोखे मंदिर; जाणून घ्या ९९ लाख ९९ हजार ९९९ दगडी मूर्तींचे रहस्य...
16
"त्यांच्या शेवटाची वाट पाहत होता, हे स्वप्न नाही तर नमकहरामी"; अश्विनी जगतापांच्या स्टेटसने संघर्ष चव्हाट्यावर
17
Bala Nandgaonkar : "रात्र वैऱ्याची आहे, यावेळी मराठी माणूस चुकला तर..."; ठाकरेंच्या निष्ठावंताची भावुक पोस्ट
18
चोर असावा तर असा! आधी देवीची माफी मागितली, मग दागिने केले लंपास; Video व्हायरल
19
"अजित पवारांनी २५ वर्षे ही माहिती का दडवली?", ३१०  कोटींच्या प्रकल्पावरून एकनाथ खडसे यांनी घेरले, गंभीर मुद्द्यांवर बोट
20
मकरसंक्रांतीच्या दिवशीच दुर्दैवी घटना; चायनीज मांजाने गळा कापल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

सातारा नगरपालिकेचे सर्व उमेदवार एकाच व्यासपीठावर आले, भावी नगराध्यक्ष प्रश्नोत्तरात ‘गडबडले’

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2025 19:30 IST

Local Body Election: सातारा विकासाचे व्हिजन : प्रश्नांच्या सरबतीने उमेदवार घायल

सातारा : सातारा नगरपालिकेच्या सर्वोच्च पदासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या नऊ मातब्बर उमेदवार शुक्रवारी (दि. २८) एकाच व्यासपीठावर आले होते. यावेळी ‘जनता दरबारात’ झालेल्या प्रश्नांच्या सरबतीने त्यांची पुरती दमछाक झाली. शहराच्या विकासाचे व्हिजन मांडताना हेच भावी नगराध्यक्ष साताऱ्याच्या भौगोलिक क्षेत्राशी संबंधित अत्यंत मूलभूत प्रश्नांची उत्तरे देताना ‘गडबडून' गेले.बालाजी चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक राजेंद्र चोरगे यांनी अमेरिकेतील ‘प्रेसिडेंशियल डिबेट’च्या धर्तीवर ‘साता-याचे व्हिजन’ या विषयांवर भावी नगराध्यक्षांना एकाच व्यासपीठावर निमंत्रित केले होते. यावेळी शहरातील सामाजिक, औद्योगिक, राजकीय व सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरमंडळी उपस्थित होती.सुरवातीला चोरगे यांनी सातारा शहराच्या भौगोलिक क्षेत्रफळापासून ते लोकसंख्येपर्यंत काही मूलभूत प्रश्न उपस्थित केले. परंतु, भावी नगराध्यक्षांना त्याची उत्तरे देता आली नाहीत. त्यानंतर भावी नगराध्यक्ष होण्यासाठी इच्छुक नऊ उमेदवारांनी शहर विकासाचे व्हिजन विषयीची संकल्पना मांडली. दीपक प्रभावळकर व चित्रा भिसे यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.या परिसंवादात भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार अमोल मोहिते, महाविकास आघाडीच्या उमेदवार सुवर्णा पाटील, अपक्ष उमेदवार शरद काटकर, सुधीर विसापुरे, सनी काटे, अभिजित बिचुकले, रवींद्र भनगे, गणेश भिसे, सागर भिसे यांनी सहभाग घेतला.

ते आठ प्रश्न अन् न देता आलेली उत्तरे...

  • सातारा शहराचे क्षेत्रफळ किती आहे - २६.५५ चौरस किलोमीटर
  • सातारा शहरातील एकूण रस्ते किती किलोमीटरचे आहेत - ३२० किलोमीटर
  • सातारा शहरात पाण्याच्या टाकी किती आहेत - १८
  • सातारा शहराला रोज किती पाणी लागते - ३० एमएलडी
  • सातारा शहरात कागदावर असलेली स्वच्छतागृह किती - ६०
  • सातारा शहरात रोज किती टन कचरा निर्माण होतो - ६० टन
  • साताऱ्यामध्ये पार्किंग सुविधा किती ठिकाणी आहे - २ ते ३
  • सातारा शहराची लोकसंख्या किती - १ लाख ८० हजार

स्टॅम्पवर लेखी हमी...

  • प्रश्न-उत्तरांच्या सामन्यात उमेदवार कमी पडले असले तरी, त्यांनी आपले व्हिजन प्रभावीपणे मांडले. यामध्ये एमआयडीसी विकास, अतिक्रमणमुक्त शहर, पोवई नाका पदपथ, किल्ले अजिंक्यतारा, ऐतिहासिक तळ्यांचे सुशोभीकरण, हॉकर्स झोन आणि रोजगार निर्मिती, महिला सुरक्षा, झोपडपट्टी विकास, आरोग्य केंद्र, सीसीटीव्ही, भ्रष्टाचारमुक्त पारदर्शी कारभार यांसारख्या मुद्द्यांना त्यांनी प्राधान्य देण्याचे आश्वासन दिले.
  • यावेळी सर्वांत महत्त्वाचा मुद्दा ठरला, तो म्हणजे उमेदवारांनी दिलेले प्रतिज्ञापत्र. जनतेशी बांधील राहून काम करण्याची आणि दिलेले वचन पाळण्यात अपयशी ठरल्यास नैतिकदृष्ट्या पुन्हा निवडणुकीला सामोरे जाणार नाही, अशी हमी त्यांनी स्टॅम्प पेपरवर लिहून दिली.
English
हिंदी सारांश
Web Title : Satara mayoral candidates on one stage; future mayor falters in Q&A.

Web Summary : Satara's mayoral candidates gathered for a public forum, facing tough questions about the city's issues. While outlining their visions, some struggled with basic geographical and infrastructural details. Promises included development, transparency and accountability, even signing pledges to ensure commitment and potential resignation if promises are broken.