शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अजित पवारांनी सोडला साताऱ्याचा नाद...उदयनराजेंना संधी मिळणार

By दीपक शिंदे | Updated: March 9, 2024 17:02 IST

बारामती, रायगड अन् शिरूरवरच समाधान 

दीपक शिंदेसातारा : सातारा लोकसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचाअजित पवार गट आग्रही होता. मात्र, भाजपने या मतदारसंघावर आपला दावा करत सातारा भाजपसाठी सोडण्याची मागणी लावून धरली. त्यामुळे अजित पवार यांनी सातारा लोकसभा मतदारसंघ भाजपसाठी सोडला असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. राष्ट्रवादीच्या गटात त्यामुळे अस्वस्थता असली तरीदेखील त्यांना सोबतच काम करावे लागणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबईत झालेल्या बैठकीत सातारा लोकसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेसलाच मिळाला पाहिजे, अशी आग्रही मागणी आमदार मकरंद पाटील यांनी केली. त्याबाबत अजित पवार यांनीही आपण साताऱ्याबाबत आग्रही असल्याचे सांगितले. मात्र, मागील दोन दिवसांत अनेक बैठका आणि चर्चा सुरू झाल्या असून अजित पवारांनी साताऱ्याचा नाद सोडून केवळ बारामती, रायगड आणि शिरूरवरच समाधान मानल्याचे सांगण्यात येत आहे.राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढविण्याचा प्रयत्न करण्यात येत असताना मिळणाऱ्या कमी जागा या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटासाठी अडचणीचा विषय ठरणार आहे. त्यामुळे या गटात थोडी नाराजीच दिसून येत आहे. आमदार मकरंद पाटील यांनी जागा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाली नाही तर कार्यकर्त्यांची जबाबदारी आम्ही घेणार नाही, असा निकराचा इशारा दिला होता. मात्र, भाजपच्या राजकीय दबावापोटी फार काही हातात पडेल असे दिसत नसल्याने, मिळणाऱ्या जागांवरच समाधानी होऊन त्याच जागांवर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

खासदार उदयनराजेंचे कार्यकर्ते लागले कामालाराष्ट्रवादी काँग्रेसने सातारा मतदारसंघ सोडल्याचे कळताच खासदार उदयनराजे भोसले यांचे कार्यकर्ते पुन्हा जोशात कामाला लागले आहेत. मेळावे आणि मोठमोठे कार्यक्रम आयोजित करून निवडणुकीपूर्वीच उदयनराजेंचा प्रचार सर्वदूर पोहोचविण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. कार्यक्रमांना होत असलेली गर्दी आणि साताऱ्याचा खासदार असावा, अशी असणारी अपेक्षा यामुळे कार्यकर्त्यांमध्येही उत्साह निर्माण झाला असून लवकरच अधिकृत घोषणा होण्याची सर्वांना आतुरता लागलेली आहे.

सातारा लोकसभा मतदारसंघ हा खासदार उदयनराजेंसाठी अधिक अनुकूल आहे. त्यामुळे या मतदारसंघातून त्यांनाच संधी मिळावी, अशी मागणी आम्ही केली होती. भाजपच्या नेतृत्वाने देखील या मागणीचा गांभीर्याने विचार केला आहे. त्यामुळे उदयनराजेंना नक्कीच संधी मिळणार असून कार्यकर्त्यांमध्येही उत्साह वाढला आहे. - सुनील काटकर, समन्वयक, सातारा लोकसभा मतदारसंघ 

सातारा लोकसभा मतदारसंघ हा भाजपला सोडला जावा, अशी आमची कायम मागणी होती. भाजपची जिल्ह्यातील ताकद वाढली आहे. त्याबरोबरच मित्रपक्षांच्या सोबतीने भाजपला हक्काचा खासदार मिळवून देण्याची संधी आहे. लवकरच याबाबत वरिष्ठ पातळीवरून निर्णय होणार असून सर्वच जण आता या निर्णयाची वाट पाहत आहेत. - धैर्यशील कदम, जिल्हाध्यक्ष, भाजप

टॅग्स :Satara areaसातारा परिसरlok sabhaलोकसभाNCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवारBJPभाजपाUdayanraje Bhosaleउदयनराजे भोसले