शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

अजित पवारांमुळे भाजपला फरक नाही; भाजपचे मंत्री स्पष्टच बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2023 08:12 IST

अजयकुमार मिश्रा : लोकसभेच्या उमेदवारीबाबत योग्यवेळी निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे महायुतीमध्ये सामील झाले आहेत. महाराष्ट्रात भाजपा सर्वात मोठा पक्ष आहे. १८ कोटी सदस्य झाले आहेत. त्यामुळे भाजपला  काही फरक पडेल असे वाटत नाही. जो काही फायदा, तोटा होईल, ते भविष्यात समजलेच, असे प्रतिपादन केंद्रीय गृहराज्यमंत्री  व भाजपचे साताऱ्याचे संपर्क प्रभारी अजय कुमार मिश्रा यांनी केले. 

सातारा येथील शासकीय विश्रामगृहात ते पत्रकार परिषदेत बोलत होते. मिश्रा पुढे म्हणाले, गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर भारताच्या नव्या संसद भवनामध्ये ऐतिहासिक निर्णय घेण्यात आले. यामध्ये महिलांना ३३ टक्के आरक्षण, जी - २० परिषद आणि १३ हजार कोटींची महत्त्वाकांक्षी विश्वकर्मा योजना यामुळे भारताने देशातील विविध विकास योजनांना वेगळी गती दिली आहे. जी -२० परिषदेच्या माध्यमातून भारताने आपली संस्कृती आणि परंपरा यांची वेगळी ओळख जगाला घडवून दिली आहे. या परिषदेच्या भारतातील ६० शहरांमध्ये बैठका घेण्यात आल्या होत्या. विश्वशांतीच्या दृष्टीने आणि विश्वकल्याणाच्या दृष्टीने भारत हे एक प्रमुख केंद्र असल्याची जाणीव या परिषदेच्या निमित्ताने निर्माण झाली. 

मिश्रा म्हणाले, महाराष्ट्रामध्ये खासदारकीच्या सर्व ४८  जागा खात्रीने निवडून आणणार आहे. सातारा लोकसभेच्या निवडणुकीमध्ये नवीन चेहरा कोणता असणार याबाबत मिश्रा म्हणाले, अद्याप वरिष्ठ कार्यकारिणीची बैठक झालेली नाही. ज्यावेळी बैठकीच्या माध्यमातून योग्य व्यक्तींचे निर्णय होतील, त्यावेळी ही नावे जाहीर केली जातील. मराठा आणि धनगर आरक्षणाच्या संदर्भामध्ये घटनात्मक तरतुदी तपासून चिकित्सा समितीकडे या संदर्भात चर्चा सुरू आहे. योग्य वेळी या दोन्ही आरक्षणाच्या संदर्भात योग्य तो निर्णय घेतला जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवारBJPभाजपा