शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

अजित पवारांचा बूस्टर डोस राष्ट्रवादीच्या नेत्यांना सोसणार का?, कार्यकर्त्यांमध्ये दबक्या आवाजात चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2023 14:10 IST

कोरेगावात अजित पवार यांनी व्यासपीठावरील नेते मंडळींसह प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना बूस्टर डोस दिला

साहिल शहाकोरेगाव : कोरेगावात सोमवारी झालेल्या दौऱ्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी व्यासपीठावरील नेते मंडळींसह प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना बूस्टर डोस दिला. निवडणुकीच्या यश-अपयशाबद्दल बोलत असतानाच त्यांनी जनतेत जाऊन काम करण्याचा कानमंत्र दिला. मात्र, हा कानमंत्र किती जणांच्या पचनी पडला आणि भविष्यकाळात हा कानमंत्र वापरून राष्ट्रवादीला ऊर्जितावस्था मिळवून देणार का, असा सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे. मंगळवारी कार्यकर्त्यांमध्ये या विषयाची दबक्या आवाजात चर्चा होती.विधानसभा निवडणुकीपासून कोरेगाव मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस सातत्याने बॅक फूटवर जात होती. अनेक निवडणुकीत पराभवाला सामोरे जात असताना पक्ष संघटना काही केल्या बळकट होत नव्हती. बाजार समिती निवडणुकीत मात्र आमदार शशिकांत शिंदे यांनी सोशल इंजिनिअरिंगचा वापर करत महाविकास आघाडीची वज्रमूठ बांधली. केवळ मूठ बांधून ते थांबले नाहीत तर निवडणुकीच्या शेवटच्या क्षणापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला बरोबर घेऊन विजय संपादन केला. या निवडणुकीत राष्ट्रवादीला काहीअंशी अंतर्गत गटबाजीला सामोरे जावे लागले. मात्र सांघिक यश मिळवत बाजार समितीवर महाविकास आघाडीचा झेंडा फडकला.या विजयाप्रीत्यर्थ अजितदादा पवार यांनी कोरेगावात येऊन जाहीर सभा घेतली. स्पष्ट वक्ते आणि कुशल प्रशासक या दोन्ही भूमिका त्यांच्या भाषणामधून दिसून आल्या. त्यांनी विजयी झालेल्या संचालकांना शुभेच्छा देत असताना चांगले काम करण्याच्या सूचना दिल्या. नेते मंडळींनाही कानपिचक्या देत या विजयाने हुरळून न जाण्याचा इशारा दिला.अजित पवार यांचा कोरेगावशी तसा निकटचा संबंध आहे. सातत्याने ते कोरेगाव दौऱ्यावर येत असतात, त्यामुळे त्यांना तालुक्याची किंबहुना विधानसभा मतदारसंघाची खडान्खडा माहिती आहे. त्यांनी भाषणामध्ये स्वकियांबरोबरच विरोधकांचा सातबारादेखील काढला. अनेकांनी आपली राजकीय दृष्टी बदलावी यासाठी आपापले चष्मेदेखील पुसायला भाग पाडले, मात्र या नेते मंडळींची राजकीय दृष्टी भविष्यकाळात तरी सुधारेल का, हा मोठा प्रश्न आहे.पवार कुटुंबातील व्यक्ती आली की पक्ष संघटना जिवंत होते आणि त्यांची वाट फिरल्यानंतर येरे माझ्या मागल्या, अशी परिस्थिती या मतदारसंघात आजवर पहावयास मिळते. त्यामुळे अजितदादांचा दौरा हा राष्ट्रवादी काँग्रेसला फलदायी ठरणार का? हा आगामी काळच ठरवणार आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरAjit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसPoliticsराजकारण