‘अजिंक्यतारा’चे मैदान कौस्तुभने मारले १०९ कुस्त्या निकाली : हजारो शौकिनांच्या डोळ्यांचे पारणे फेडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2018 22:35 IST2018-03-30T22:35:23+5:302018-03-30T22:35:23+5:30
सातारा : आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले मित्र मंडळाच्या वतीने अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याच्या

‘अजिंक्यतारा’चे मैदान कौस्तुभने मारले १०९ कुस्त्या निकाली : हजारो शौकिनांच्या डोळ्यांचे पारणे फेडले
सातारा : आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले मित्र मंडळाच्या वतीने अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर गुरुवारी झालेल्या कुस्ती स्पर्धेत पैलवान कौस्तुभ डाफळे आणि पैलवान ज्ञानेश्वर गोचडे यांच्यातील कुस्ती चांगली रंगली. या लढतीत पैलवान कौस्तुभने ज्ञानेश्वरला चितपट करून विजय मिळविला.
विजेत्या मल्लांना आमदार शिवेंद्रसिंहराजे व मान्यवरांच्या हस्ते रोख बक्षीस देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेतील खास आकर्षण असलेल्या प्रथम क्रमांकाच्या कुस्तीत पैलवान कौस्तुभ डाफळे (राष्ट्रीय चॅम्पियन, काका पवार तालीम पुणे) याने प्रतिस्पर्धी पैलवान ज्ञानेश्वर गोचडे (पुणे) याचा पराभव केले. या मैदानात १०९ निकाली कुस्त्या झाल्या आणि रंगतदार कुस्त्यांमुळे उपस्थित हजारो कुस्ती शौकिनांच्या डोळ्यांचे पारणे फेडले.
याप्रसंगी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा हजारो कुस्ती शौकिनांच्या उपस्थितीत सातारा तालुक्यातील जनतेच्या वतीने सत्कार करून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी उपस्थित जुने हिंदकेसरी व महाराष्टÑ केसरी तसेच जुने नामांकित मल्ल कुस्ती कोच पैलवान व वस्ताद आदी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
स्पर्धेसाठी सातारा, सांगली, पुणे, कोल्हापूर, पंजाब, हरियाणा, दिल्ली आदी ठिकाणावरुन आले होेते. प्रथम क्रमांकाच्या कुस्तीस प्रारंभ होताच दोघांनी एकमेकाचा अंदाज घेत चढाई केली. मात्र दोघांचेही बलाबलसमान ठरल्यामुळे पैलवान कौस्तुभ डाफळे हा पंचांच्या गुणावर विजयी झाला.दोन नंबरची कुस्तीमध्ये पै. योगेश बोंबाळेने पै.गोकूळ आवारेला चितपट करुन विजयी झाला. तीन नंबरची कुस्तीमध्ये पैलवान विकास जाधवने पै. सोनूचा पराभव करुन विजयी झाला. चौथ्या कुस्तीत पै. राजन तोमरने पै. अमोल फडतरेचा पराभव करुन विजयी ठरला.
पाचव्या कुस्तीत पै.नीलेश लोखंडेने प्रेमकुमारचा पराभव करुन विजयी ठरला. कुस्ती पंच म्हणून उत्तमराव पाटील, दिलीप पवार, सदाशिव गायकवाड, कांता जाधव, पैलवान नंदकुमार जगदाळे,पैलवान जितेंद्र कणसे यांनी काम पाहिले. पै. शंकर पुजारी, पांडुरंग कणसे यांनी समालोचन केले. हलगीवादक मारुती मोरे यांनी हलगी वादन केले.
भाऊसाहेब यांच्या स्मृतीसाठी पुन्हा आखाडा
‘दिवंगत भाऊसाहेब महाराजांनी आखाडा सुरू करण्याची मुहूर्तमेढ रोवली होती. मध्यंतरी खंड पडला होता. परंतु त्यांची स्मृती जागविण्याच्या दृष्टीने पुन्हा सर्वांच्या सहकार्याने आखाडा सुरू करण्यात आला आहे. यापुढेही यापेक्षा दर्जेदार आखाडा आणि मोठ-मोठ्या कुस्त्या घेण्यात येतील.असा मनोदय व्यक्त केला. तसेच कुस्ती जिवंत राहिली पाहिजे, कुस्तीला चालना मिळाली पाहिजे, ग्रामीण भागात चांगले मल्ल तयार झाले पाहिजेत, यासाठी गेल्या आठ वर्षांपासून हा उपक्रम राबिवला जात असून, उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.