कृषी विभागाकडून कृषी संजीवनी सप्ताहाचे आयोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:25 IST2021-06-21T04:25:16+5:302021-06-21T04:25:16+5:30
कोपर्डे हवेली : महाराष्ट्र शासन कृषी विभागातर्फे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी कृषी संजीवनी सप्ताहाचे दि. २१ जून ते १ ...

कृषी विभागाकडून कृषी संजीवनी सप्ताहाचे आयोजन
कोपर्डे हवेली : महाराष्ट्र शासन कृषी विभागातर्फे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी कृषी संजीवनी सप्ताहाचे दि. २१ जून ते १ जुलै या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे. यावेळी शेतकऱ्यांना बांधावर जाऊन मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
सैदापूर कृषी मंडलाच्यावतीने ४५ गावांमध्ये हा संजीव कृषी सप्ताह राबविण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गुरुदत्त काळे, उपविभागीय कृषी अधिकारी दौलतराव चव्हाण, कऱ्हाड तालुका कृषी अधिकारी रियाज मुल्ला, सैदापूर कृषी मंडल अधिकारी विनय कदम हे मार्गदर्शन करणार आहेत.
कृषी विभागामार्फत दि. २१ जून ते १ जुलै या कालावधीत रासायनिक खतांची बचत, जैविक बीज प्रक्रिया, बियाण्यामधून होणारा किडीचा प्रादुर्भाव, हिरवळी खतांचा वापर, सेंद्रिय खतांचा वापर, जमिनीची आरोग्य पत्रिका तसेच कृषी विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध योजना, शेतकऱ्यांना एकाच अर्जामध्ये योजनांचा लाभ घेण्यासाठी महाडीबीटी महाआयटी या संकेतस्थळाचा वापर कसा करायचा, याचे मार्गदर्शन करण्यात येणार आहे. महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत फळबाग लागवड, नापेड युनिट उभारणी, गांडूळ खत, शेततळे याबाबत शेतकऱ्यांकडून अर्ज मागविण्यात येणार आहेत.