आगाशिवनगर झोपडपट्टी होणार आता ‘आदर्श वसाहत’
By Admin | Updated: August 22, 2014 00:56 IST2014-08-21T20:42:12+5:302014-08-22T00:56:18+5:30
आराखडा तयार : पाच कोटींच्या कामांना मंजुरी

आगाशिवनगर झोपडपट्टी होणार आता ‘आदर्श वसाहत’
मलकापूर : आगाशिवनगर झोपडपट्टीच्या संरक्षक भिंतीस दोन कोटी १५ लाख निधी नगरपंचायतीकडे वर्ग झाला आहे. संरक्षक भिंतीच्या कामाची निविदा काढणे व राजीव आवास योजनेअंतर्गत पाचशे कुटुंबांना आरसीसी घरे बांधून देण्यासाठी २६ कोटी २५ लाखांचा प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी सल्लागार नियुक्तीचा महत्त्वपूर्ण ठराव मंगळवारी झालेल्या विशेष सभेत केला.
सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा शारदा खिलारे होत्या. सभेतील विषयवाचन उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांनी केले. मुख्याधिकारी राजेंद्र तेली यांच्यासह सर्व नगरसेवक उपस्थित होते. झोपडपट्टी संरक्षक भिंत, जॅकवेल रस्ता खडीकरण, डांबरीकरण, जॅकवेल व जलशुद्धीकरण केंद्रातील पंप दुरुस्ती यासह रस्ते विकास अनुदानातून होणाऱ्या १६ रस्त्यांच्या कामाच्या चार कोटी आठ लाख ९३ हजार ४०९ खर्चाच्या निविदा काढण्यास मंजुरी देण्यात आली. यावेळी काही रस्त्यांवर झालेली अतिक्रमणे काढावीत, अशी सूचना हणमंतराव जाधव व राजेंद्र यादव यांनी केली. झोपडपट्टीतील पाचशे कुटुंबांना प्रत्येकी २१० ते २९० स्क्वेअर फुटाची घरे देण्याचा आराखडा तयार करण्यात आला. दोन रूम, किचन, शौचालय, बाथरूम अशा पद्धतीने सोयीनियुक्त आदर्श वसाहत निर्माण करण्यासाठी तांत्रिक सल्लागार नियुक्तीस मंजुरी देण्यात आली. (प्रतिनिधी)

एक कोटी २४ लाखांच्या कामांचे आदेश
तेराव्या वित्त आयोगाच्या ५० लाख २२ हजार ६३९ रुपये निधीतून बालसंस्कार केंद्र, बगीचा यासह विविध कामे करणे, नगरपंचायत फंडातील रस्ते अनुदानातून १९ लाख ७० हजार ७२४ रुपयांची कामे, दलितवस्ती सुधार योजनेच्या ३० लाख २५ हजार ८६० रुपये खर्चातून सर्वाेदय सोसायटीत संरक्षक भिंत, पाणी योजनेची जीआयएस प्रणाली अद्ययावत करणे, स्पॉट बिलिंग मशीन खरेदीसाठी १८ लाख ९१ हजार १०० अशा एकूण एक कोटी २४ लाख १४ हजार ३२६ रुपये खर्चाची कामे दोन महिन्यांत कामे पूर्ण करण्याचा ठराव करण्यात आला.