शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

..अखेर दोन महिन्यांनी कऱ्हाडचा आठवीतला बेपत्ता मुलगा सापडला पंजाबमध्ये!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2022 17:03 IST

नातेवाईकांकडे गेलेला संबंधित शाळकरी मुलगा तेथून अचानक बेपत्ता झाला. अन्

संजय पाटीलकऱ्हाड : कऱ्हाड तालुक्यातील पाडळी येथील आठवीत शिकणारा साईनाथ चव्हाण हा मुलगा जून महिन्यात अचानक बेपत्ता झाला होता. मिरारोड येथील नातेवाईकांच्या घरातून तो निघून गेला होता. त्याच्या शोधासाठी पोलिसांची पथके ठिकठीकाणी तपास करीत होती. अखेर दोन महिन्यांनी बेपत्ता साईनाथ पंजाबच्या अमृतसरमध्ये पोलिसांना आढळून आला. त्याला ताब्यात घेऊन पोलिसांनी बालसुधारगृहात ठेवले आहे.तालुक्यातील पाडळी येथील शाळकरी मुलगा साईनाथ चव्हाण हा जून महिन्यात मिरारोड येथे नातेवाईकांकडे गेला होता. तेथून तो अचानक बेपत्ता झाला. हे प्रकरण मिरारोड पोलिसांनी अत्यंत गांभिर्याने घेत सर्व शक्यता गृहीत धरून तपास सुरू केला. पोलीस उपायुक्त अमित काळे, पोलीस निरिक्षक विजयसिंग बागल यांच्या मार्गदर्शनाखाली मिरारोडच्या पोलीस उपनिरिक्षक स्नेहल तांबडे या तपासासाठी कऱ्हाडला आल्या होत्या. त्यांनी शहर व ग्रामिण पोलिसांच्या मदतीने साईनाथचा शोध घेतला. तसेच तो कोणाच्या संपर्कात होता, याची चौकशी करून अनेकांचे जबाब घेतले. त्यावेळी पोलिसांच्या हाती काही महत्वाची माहिती लागली.त्यानुसार पोलीस उपनिरिक्षक स्नेहल तांबडे यांच्यासह गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरिक्षक वंजारी, कॉन्स्टेबल पवार, कॉन्स्टेबल हर्णे, कॉन्स्टेबल चकोर यांचे पथक गत आठवड्यात पंजाबला रवाना झाले. पंजाबच्या अमृतसर, गुरूदासपूर भागात साईनाथचा कसून शोध घेत पोलिसांनी पंजाबमधील काही संस्थांशीही संपर्क साधला. चार दिवसांच्या अथक प्रयत्नानंतर अमृतसर येथील गोल्डन टेम्पलमध्ये साईनाथ आढळून आला. पोलिसांनी त्याला मिरारोड येथे आणले असून बालसुधारगृहात त्याला ठेवण्यात आले आहे.

कऱ्हाडच्या शाळेत शिकणारा मुलगा मिरारोडमधून बेपत्ता झाल्याने वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू होता. पंजाब राज्यात तो गेला असावा असे धागेदोरे हाती लागल्याने मुलाच्या शोधासाठी आम्ही पंजाबला रवाना झालो. तो तेथे सापडला. तो नेमका कोणत्या कारणासाठी गेला होता, याचा तपास वरिष्ठांमार्फत सुरू आहे. - स्नेहल तांबवे, तपासी अधिकारी, पोलीस उपनिरीक्षक, मिरारोड

टॅग्स :Satara areaसातारा परिसरMissingबेपत्ता होणंCrime Newsगुन्हेगारीStudentविद्यार्थी