शहरं
Join us  
Trending Stories
1
लालू परिवाराच्या अडचणीत वाढ! 'जमिनीच्या बदल्यात नोकरी' प्रकरणात दिल्ली कोर्टाकडून दोषारोप निश्चित; आता खटला चालणार
2
सरेंडर व्हायला किती वेळ लागतो? मैत्री एका बाजूला म्हणत राज ठाकरेंचा फडणवीस-शिंदेंवर घणाघाती प्रहार
3
'मोदींनी ट्रम्प यांना फोनच केला नाही,आता अमेरिका...'; व्यापार करारावर अमेरिकेच्या मंत्र्यांचा खळबळजनक दावा
4
एसबीआय, बँक ऑफ इंडिया की बँक ऑफ बडोदा... सर्वात स्वस्त Home Loan कोण देतंय? ६० लाखांवर किती ईएमआय?
5
"इराण एक महान देश...!"; आता काय आहे ट्रम्प यांचा प्लॅन? नेमकं काय म्हणाले? मोठा खुलासा करत दिला थेट इशारा!
6
कोलकात्यात हायव्होल्टेज ड्रामा; ममता बॅनर्जींकडून ईडीविरोधात FIR वर FIR; प्रकरण कोर्टात पोहोचले...
7
"आधी गोळ्या घालू मग प्रश्न विचारू"; ट्रम्प यांच्या लष्करी धमकीला 'या' देशाने दिलं सडेतोड उत्तर
8
तेलंगणा, पंजाबमध्ये बॅलेट पेपरवर मतदान झाले, तिथे भाजप चौथ्या, सातव्या नंबरवर फेकला गेला : राज ठाकरे
9
'या' ६ सरकारी स्कीम्समध्ये मिळतो लाखोंचा लाभ, प्रीमिअम ₹१०० पेक्षाही कमी; गरीब असो वा श्रीमंत सर्वच घेऊ शकतात फायदा
10
हॅलो, इसको भेज, उसको भेज...! पाकिस्तानने युपीआयपेक्षा फास्ट पेमेंट सिस्टीम शोधली; बोलताच पैसे ट्रान्सफर होणार
11
Lokmat Exclusive: ठाकरे मुंबई नक्कीच गमावतील, महापालिकांमध्ये निवडणुकोत्तर नवीन समीकरणे: CM देवेंद्र फडणवीस
12
१० जानेवारी: गुरु-आदित्य योग: तुमच्या आयुष्यातील अडचणी निवारणासाठी उत्तम योग; करा 'हा' उपाय 
13
व्हेनेझुएलाचं कच्चं तेल खरेदी करू शकते रिलायन्स इंडस्ट्रीज; का आणि कशी बदलली परिस्थिती?
14
क्रूरतेचा कळस! जेवण वाढायला उशीर झाला म्हणून पतीने पत्नीला संपवलं; मृतदेहापाशीच बसून राहिला अन्..
15
Stock Market Today: सततच्या घसरणीनंतर आज शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स १५० अंकांनी वधारला; Vodafone-Idea मध्ये ५% ची तेजी
16
"सगळ्या योजना आखल्या पण याची कधी अपेक्षाच केली नाही"; ठाकरे बंधुंच्या युतीवर राज ठाकरेंचा पलटवार
17
IT हब की नरकाचे द्वार? बेंगळुरूत पहाटे ३:३० वाजताही वाहतूक कोंडी सुटेना; दोन-दोन तास...
18
५ वर्षांचं अफेअर, ३ मुलं, पण इन्स्टावरील प्रेमासाठी घर सोडलं; पतीनेच स्वहस्ते लावून दिलं पत्नीचं दुसरं लग्न!
19
Crypto वर देखरेख ठेवणं कठीण! RBI नंतर आता आयकर विभागानंही हात वर केले, प्रकरण काय?
20
रिमांड संपली, पाप उघडं पडलं! बांगलादेश दिपू हत्या प्रकरणातील १८ जण कोठडीत; त्यांनी जे कारण सांगितलं..
Daily Top 2Weekly Top 5

‘लोकमत’च्या वृत्तानंतर संमेलनाध्यक्षांच्या पत्नीचा सन्मान!, समारोप सोहळ्यात व्यासपीठावर स्थान

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2026 17:11 IST

99th Marathi Sahitya Sammelan: अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आजवरच्या परंपरेनुसार संमेलनाध्यक्षांचा सपत्नीक सत्कार केला जातो आणि त्यांच्या पत्नीला व्यासपीठावर सन्मानाचे स्थान दिले जाते

संदीप आडनाईकछत्रपती थोरले शाहू महाराज साहित्यनगरी सातारा : ९९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्यात संमेलनाध्यक्ष विश्वास पाटील यांच्या पत्नीला व्यासपीठावर स्थान न मिळाल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची दखल अखेर संमेलन महामंडळ व आयोजकांनी घेतली. रविवारी (दि. ४) पार पडलेल्या संमेलनाच्या समारोप सोहळ्यात विश्वास पाटील यांच्या पत्नी चंद्रसेना यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आजवरच्या परंपरेनुसार संमेलनाध्यक्षांचा सपत्नीक सत्कार केला जातो आणि त्यांच्या पत्नीला व्यासपीठावर सन्मानाचे स्थान दिले जाते. मात्र, यंदाच्या उद्घाटन समारंभात ही प्रथा पाळली गेली नाही. विश्वास पाटील यांच्या पत्नी व्यासपीठावर न बसता प्रेक्षागृहात खाली बसलेल्या दिसल्या, तसेच सत्कारातही त्यांचा समावेश करण्यात आला नव्हता. या घटनेची साहित्य वर्तुळात मोठ्या प्रमाणावर चर्चा झाली होती.

वाचा : शिवाजी महाराज यांनी सुरत लुटल्याने समृद्धी - रघुवीर चौधरी ‘लोकमत’ने याबाबत वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर साहित्यप्रेमी, अभ्यासक व काही मान्यवरांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली. परंपरा, सन्मान आणि संवेदनशीलतेचा मुद्दा उपस्थित होताच आयोजकांवर दबाव वाढला. त्यानंतर समारोप सोहळ्यात संमेलनाध्यक्ष विश्वास पाटील यांच्या पत्नीला मंचावर आमंत्रित करून औपचारिक शब्दांत सन्मान करण्यात आला.कोण आहेत चंद्रसेना पाटील...चंद्रसेना पाटील या ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी दिवंगत बाबूराव किवळकर यांच्या भाची (बहिणीची मुलगी) आहेत. बाबूराव किवळकर हे यशवंतराव चव्हाण यांचे ज्येष्ठ सहकारी होते. फलटणचे प्रांताधिकारी असताना १९८८ मध्ये विश्वास पाटील यांचं लग्न झालं होतं.

English
हिंदी सारांश
Web Title : Lokmat report leads to honor for president's wife at event.

Web Summary : After a Lokmat report highlighted the omission, the Marathi Sahitya Sammelan honored the president's wife, Chandrasena Patil, during the closing ceremony. She was given a prominent place on the stage, rectifying the earlier oversight.