सातारा : बहिणीचा खून दाजीने केल्याचे समजताच दोन मेहुण्यांनी दाजीला अक्षरश: बदडून काढले. जखमी दाजीवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.राजेंद्र शिंदे (वय ३२, रा. सातारा) याने पत्नी अंजली शिंदे हिचा शुक्रवारी रात्री खून केल्याचे समोर आले होते. एवढेच नव्हे तर, राजेंद्रने पत्नीचा खून केल्यानंतर मृतदेह काॅटखाली लपवून ठेवला होता. याचवेळी अंजली शिंदे यांचे दोन्ही भाऊ त्या ठिकाणी पोहोचले. आपल्या बहिणीचा खून केल्याचे समजताच दोघांनी संतप्त होऊन दाजी राजेंद्र याची यथेच्छ धुलाई केली. यात दाजी जखमी झाला. गेल्या दोन दिवसांपासून त्याच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दुसरीकडे दोन्ही मेहुण्यांवर शाहूपुरी पोलिस ठाण्यात या मारहाणप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बहिणीच्या खुनानंतर मेहुण्यांनी दाजीची केली धुलाई, साताऱ्यातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2025 13:59 IST