शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

Satara: प्रेमीयुगुल पळाले; संतप्त नातेवाईकांनी युवकाच्या कुटूंबाला मारहाण करीत केला एकाचा खून

By संजय पाटील | Updated: October 31, 2023 16:13 IST

दहाजणांवर गुन्हा दाखल

कऱ्हाड : प्रेमीयुगुल पळून गेल्यानंतर संतप्त झालेल्या युवतीच्या नातेवाईकांनी युवकाच्या कुटूंबाला मारहाण करीत एकाचा खून केला. जनार्दन महादेव गुरव (रा. राजमाची) असे खून झालेल्याचे नाव आहे. सुर्ली, ता. कऱ्हाड येथील घाटात सोमवारी रात्री उशिरा ही घटना घडली. याप्रकरणी कऱ्हाड शहर पोलीस ठाण्यात दहाजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.प्रमोद विश्वास पवार (रा. राजमाची, ता. कऱ्हाड) याने याबाबतची फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हजारमाची येथील युवती काही दिवसांपासून बेपत्ता आहे. त्या युवतीला राजमाचीतील युवकाने पळवून नेल्याचा युवतीच्या कुटूंबियांना संशय होता. त्या कारणावरुन युवतीचे नातेवाईक चिडून होते. दरम्यान, सोमवारी रात्री युवतीचे नातेवाईक राजमाची येथे गेले. त्याठिकाणी त्यांनी संबंधित युवकाच्या कुटूंबियांना धमकावत युवतीला घेवून युवक कुठे गेला आहे, अशी विचारणा केली. मात्र, कुटूंबियांकडून त्यांना काहीच माहिती मिळाली नाही. त्यामुळे युवतीच्या चिडलेल्या नातेवाईकांनी युवकाच्या आई, वडिल तसेच भावाला लाकडी दांडक्याने मारहाण केली. तसेच भाऊ, वडिल व जनार्दन गुरव या तिघांना चारचाकी गाडीतून जबरदस्तीने सुर्ली घाटात नेवून त्याठिकाणीही लाकडी दांडक्याने मारहाण केली. या मारहाणीत जनार्दन गुरव हे गंभीर जखमी होवून बेशुद्ध झाले.घटनेची माहिती मिळाल्यानंतर परिसरातील ग्रामस्थांनी त्याठिकाणी धाव घेवून जखमी जनार्दन गुरव यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले. याप्रकरणी मंगळवारी पहाटे कऱ्हाड शहर पोलीस ठाण्यात दहाजणांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक प्रदीप सुर्यवंशी तपास करीत आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस