शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

सातारा : आईच्या मृत्यूनंतर जखमी मुलानेही सोडले प्राण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2018 15:53 IST

महाबेळश्वर-मेढा रस्त्यावर दोन दुचाकीस्वारांची लागलेली रेस मायलेकरांच्या जीवावर बेतली. दुचाकीच्या धडकेत रंजना कृष्णा शेलार (वय ५०, रा वागदरे, ता. जावळी) यांचा मृत्यू होऊन दोन दिवस उलटत नाहीत तोच या अपघातात जखमी झालेला त्यांचा मुलगा सागर (वय २०) याचाही शनिवारी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.

ठळक मुद्देआईच्या मृत्यूनंतर जखमी मुलानेही सोडले प्राणदुचाकीस्वारांच्या रेसचा दुसरा बळी; जावळी तालुक्यात शोककळा

मेढा : महाबेळश्वर-मेढा रस्त्यावर दोन दुचाकीस्वारांची लागलेली रेस मायलेकरांच्या जीवावर बेतली. दुचाकीच्या धडकेत रंजना कृष्णा शेलार (वय ५०, रा वागदरे, ता. जावळी) यांचा मृत्यू होऊन दोन दिवस उलटत नाहीत तोच या अपघातात जखमी झालेला त्यांचा मुलगा सागर (वय २०) याचाही शनिवारी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. अशा प्रकारे मायलेकारांचा मृत्यू झाल्याने जावळी तालुक्यावर शोककळा पसरली आहे.याबाबत अधिक महिती अशी की, महाबळेश्वर येथे राहणारा अक्षय राजेंद्र शिंदे (वय २१) आणि त्याच्या मित्राने महाबळेश्वरहून येताना दुचाकीची रेस लावली. अक्षयच्या पाठीमागे एक युवती बसली होती. दोन्ही दुचाकीस्वार अत्यंत वेगात वाकडी तिकडी गाडी करत रस्त्यावरून भरधाव निघाले होते.

याचवेळी समोरून दुचाकीवरून सागर शेलार व त्याची आई रंजना शेलार हे दोघे वागदरे येथून गवडी येथे येत होते. गवडी हे रंजना यांचे माहेर असून, त्या त्यांच्या भावाला भेटावयास निघाल्या होत्या.

गवडी येथे दत्त मंदिरानजीक असलेल्या पुढचीवाडी वस्तीनजीक सागर शेलार हा गाडी वळवत असताना अक्षय शिंदे याने सागर शेलारच्या गाडीला समोरून जोरदार धडक दिली. यावेळी गाडीवर मागे बसलेल्या रंजना शेलार या फेकल्या गेल्याने दगडावर आदळल्या.

यात त्यांच्या डोक्याला मार लागून त्या जागीच ठार झाल्या. तर सागरही गंभीर जखमी झाला होता. दरम्यान त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असताना सागरचाही मृत्यू झाला.

टॅग्स :AccidentअपघातSatara areaसातारा परिसरbikeबाईक