स्वातंत्र्यानंतर रावतांनी वाटली अकरा शेर जिलेबी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:40 IST2021-08-15T04:40:13+5:302021-08-15T04:40:13+5:30
मंडप टाकून उत्सवाचे स्वरूप स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिनादिवशी सातारकरांमधून जिलेबीला विशेष मागणी होऊ लागली. त्यामुळे खरेदीसाठी मोठ्या रांगा लागू ...

स्वातंत्र्यानंतर रावतांनी वाटली अकरा शेर जिलेबी
मंडप टाकून उत्सवाचे स्वरूप
स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिनादिवशी सातारकरांमधून जिलेबीला विशेष मागणी होऊ लागली. त्यामुळे खरेदीसाठी मोठ्या रांगा लागू लागल्या. त्यामुळे राऊत यांनी शहरातील विविध भागात या दिवशी स्टॉल उभारण्यास सुरुवात केली. आदल्या दिवशीच मंडप टाकून रात्रीपासून तयारी केली जाते. पहाटे पहाटे भट्टी पेटवून शाळा-महाविद्यालयांच्या मागणीप्रमाणे जिलेबी बनवून पोहोच केली जाते.
पाचवी पिढी व्यवसायात
जिलेबी वाटण्याची परंपरा कृष्णा राऊत यांनी सुरू केली. ती पुढे सूर्यकांत आणि प्रभाकर यांनी चालविली. तिसऱ्या पिढीतील भरतशेठ राऊत यांनी ही परंपरा जपत पुढच्या दोन पिढ्यांमध्ये रुजविली आहे. त्यांची मुले शेखर व सतीश, तसेच नातवंडे गुरूप्रसाद व शिवप्रसाद हे या व्यवसायात आहेत.
नागरिकांनीही अंगीकारलं
राऊत यांनी जिलेबी वाटण्यास सुरुवात केली. जिलेबी वाटण्यातील आनंद आजही कमी झालेला नाही. त्यामुळे शाळा-महाविद्यालय, शासकीय, निमशासकीय कार्यालये, बँकांमध्ये जिलेबी आणून कर्मचाऱ्यांना वाटली जाते, तर घरोघरी मोठी माणसं जिलेबी खरेदी करून लहान मुलांना प्रेमाने वाटतात.
कोट :
सातारकर माणूस छोट्या-छोट्या घटनांमध्ये आनंद शोधतो आणि तो इतरांना वाटण्यात धन्यता मानतो. येथे तर स्वातंत्र मिळाले होते. त्यामुळे आमच्या आजोबांनी जिलेबी वाटली. हीच परंपरा आमच्या पाचव्या पिढीने जपली आहे.
- भरतशेठ राऊत,
मिठाई विक्रेते, सातारा.