शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

लिफ्ट दिल्यानंतर एअरगनचा धाक दाखवून शिक्षिकेला लुटण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2019 11:58 IST

कारमधून लिफ्ट दिल्यानंतर शिक्षिकेला एअरगनचा धाक दाखवत लूटमार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या कारचालकाच्या मुसक्या आवळण्यात शिरवळ पोलिसांना अवघ्या दोन तासांत यश आले. गणेश मधुकर नलावडे ( वय २३, रा. लऊळ ता. माढा जि. सोलापूर ) असे अटक करण्यात आलेल्या कार चालकाचे नाव आहे.

ठळक मुद्देकार चालकाला अटक : अवघ्या दोन तासांत गुन्ह्याचा छडाअज्ञाताने दागिन्यांसह रोखड लांबविली

शिरवळ : कारमधून लिफ्ट दिल्यानंतर शिक्षिकेला एअरगनचा धाक दाखवत लूटमार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या कारचालकाच्या मुसक्या आवळण्यात शिरवळ पोलिसांना अवघ्या दोन तासांत यश आले. गणेश मधुकर नलावडे ( वय २३, रा. लऊळ ता. माढा जि. सोलापूर ) असे अटक करण्यात आलेल्या कार चालकाचे नाव आहे.याबाबत अधिक माहिती अशी, वनवासवाडी, खेड सातारा येथील वैशाली भीमराव देवकुळे (वय ४२) या शिरवळ येथील एका विद्यालयात शिक्षक म्हणून कार्यरत आहे. वैशाली देवकुळे या सातारा येथून शिरवळला रोज येत असतात. सातारा येथील बॉम्बे रेस्टॉरंट येथून शिरवळ याठिकाणी जाण्यासाठी महामार्गावर त्या मुलासमवेत आल्या होत्या. त्या ठिकाणी आलेल्या एका कारमध्ये त्या बसल्या.

शिरवळजवळ कार आली असता चालकाने अचानकपणे बॅगेतील रिव्हॉल्वरसारख्या दिसणाऱ्या हत्याराचा धाक त्यांना दाखविला. वैशाली देवकुळे यांच्या हातातील पर्स हिसकावून साहित्य व पैसे चोरण्याचा प्रयत्न करत त्याने पाच हजार रुपयांची मागणी केली. यावेळी वैशाली देवकुळे यांनी आरडाओरडा केला असता कारचालकाने कार सारोळा पुलाच्या पुढे नेत गाडीचा वेग कमी केल्याने देवकुळे या पर्ससह गाडीतून खाली उतरल्या. त्यानंतर त्यांनी शिरवळ पोलीस ठाण्यात धाव घेऊन पोलिसांना माहिती दिली.

पोलीस निरीक्षक विनायक वेताळ यांनी तत्काळ आरोपीच्या शोधासाठी पोलीस उपनिरीक्षक सागर अरगडे, हवालदार आप्पा कोलवडकर, अमोल जगदाळे, स्वप्नील दौंड , प्रशांत वाघमारे यांच्या पथकाला रवाना केले. जेजुरी येथून कार चालक गणेश नलवडे आणि त्याच्या भावाला ताब्यात घेतले. अवघ्या दोन तासांत पोलिसांनी या गुन्ह्याचा छडा लावला. नलवडेकडून एअरगण जप्त करण्यात आली आहे. न्यायालयाने कार चालक नलवडेला ३ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

अज्ञाताने दागिन्यांसह रोखड लांबविलीशिरवळ : घर व प्रवासादरम्यान अज्ञात चोरट्यांनी सोन्याचे साडे अकरा तोळे वजनाचे दागिने व ५० हजारांची रोख रक्कम चोरून नेल्याप्रकरणी शिरवळ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.याबाबत शिरवळ पोलिसांनी दिलेली माहिती अशी, रंगजना दिनकर गोळे ( सध्या रा. मुंबई. मूळ रा. सांगवी ता. खंडाळा) या कुटुंबियांसमवेत सांगवी येथे ग्रामदैवताच्या यात्रसाठी आल्या होत्या. यात्रा उरकून शिरवळमधून पुण्याला जाण्यासाठी एसटीमध्ये बसल्या. पुण्यात मुलीच्या घरी गेल्यावर बॅगमध्ये पाहिले असता आतील ऐवज लंपास झाल्याचे दिसून आले.अज्ञाताने मोहनमाळ, राणीहार, नेकलेस असे सोन्याचे साडेअकरा तोळे वजानाचे दागिने व ५० हजार रुपये रोख रक्कम नेली. त्यानंतर रंगजना गोळे यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात व्यक्तीविरोधात शिरवळ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक सागर अरगडे हे तपास करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSatara areaसातारा परिसर