रक्तदान करून नवरदेव निघाला लग्नाला!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:47 IST2021-06-09T04:47:41+5:302021-06-09T04:47:41+5:30
तांबवे येथील प्राथमिक शाळेत रविवारी रक्तदान शिबिर घेण्यात आले होते. या शिबिरास युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मात्र, एका नवरदेवाने ...

रक्तदान करून नवरदेव निघाला लग्नाला!
तांबवे येथील प्राथमिक शाळेत रविवारी रक्तदान शिबिर घेण्यात आले होते. या शिबिरास युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मात्र, एका नवरदेवाने केलेले रक्तदान हा विभागात चर्चेचा विषय झाला. पाठरवाडी येथील सागर यादव या युवकाचा रविवारी दुपारी विवाह सोहळा होता. मात्र, पाठरवाडीपासून काही अंतरावर असलेल्या तांबवे गावात रक्तदान शिबिर होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर सागर करवल्यांसह थेट शिबिरस्थळी पोहोचला. त्या ठिकाणी रक्तदान करण्याची इच्छा त्याने व्यक्त केली. त्यानंतर आवश्यक ती चाचणी करून सागरने रक्तदान केले. रक्तदान झाल्यानंतर त्याला मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तिपत्र देण्यात आले. त्यानंतर सागर विवाहासाठी मार्गस्थ झाला.
या शिबिराचे उद्घाटन गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते झाले. जिल्हा परिषद सदस्य उदयसिंह पाटील, जिल्हा परिषद सदस्य प्रदीप पाटील, प्रांताधिकारी उत्तम दिघे, गटविकास अधिकारी डॉ. आबासाहेब पवार, पोलीस उपअधीक्षक डॉ. रणजित पाटील, पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे, रामचंद्र पाटील, सरपंच शोभाताई शिंदे, सुपनेचे सरपंच अशोक झिंबरे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
फोटो : ०७केआरडी०२
कॅप्शन : तांबवे (ता. कऱ्हाड) येथे रक्तदान केल्यानंतर नवरदेव सागर यादव याला प्रशस्तिपत्र देण्यात आले. या वेळी जिल्हा परिषद सदस्य उदयसिंह पाटील, प्रदीप पाटील, प्रांताधिकारी उत्तम दिघे आदी उपस्थित होते.