शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

कोयना धरणातून २४ दिवसानंतर 'इतक्या' क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2023 17:27 IST

कोयना धरणात ५३.६९ टीएमसी पाणीसाठा

निलेश साळुंखेकोयनानगर : कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाण्याची आवक वाढल्याने आज, सोमवारी दुपारी चार वाजता धरणाच्या पायथावीजगृहातून १०५० क्युसेकने पाण्याचा विसर्ग कोयना नदीत सुरू करण्यात आला. कोयना सिंचन विभागाने याबाबत माहिती दिली. तसेच नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला. धरण पाणलोट क्षेत्रात गत आठ-दहा दिवसापासून पावसाची संततधार सुरू आहे. यामुळे पाणीसाठ्यात दररोज सरासरी तीन चार टीएमसीने वाढ होत आहे. १०५.२५ टीएमसी साठवण क्षमता असलेल्या कोयना धरण सध्या पन्नास टक्के भरले आहे. पावसाचे प्रमाण वाढत असल्याने कोयना सिंचन विभागाने दि १ जुलैला कोयना नदीतील बंद केलेला पाण्याचा विसर्ग आज, चोवीस दिवसा नंतर पुन्हा सुरू केला आहे.दुपारी चार वाजता पायथावीजगृहातील एक जनित्र संचातून वीजनिर्मिती करून पुर्वेकडे कोयना नदीत १०५० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. सायंकाळी पाच वाजता कोयना धरणात ५३.६९ टीएमसी पाणीसाठा शिल्लक होता. तर पाण्याची आवक ५९९७७ क्युसेकने सुरू होती. दरम्यान एक जून पासून सुरू झालेल्या तात्रिक वर्षात धरणातून पुर्वेला कोयना नदीत ३.११ टीएमसी पाण्याचा विसर्ग केला यामध्ये नदी विमोचकातुन ०.३३ टीएमसी व पायथावीजगृहातुन २.७७ टीएमसी पाण्याचा विसर्ग करत ७.४८१ दशलक्ष युनिट वीजनिर्मिती झाली आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरKoyana Damकोयना धरणRainपाऊसWaterपाणी