शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

Satara: कोयना धरणातून एकवीस महिन्यानंतर सांडवा विसर्ग सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2024 12:32 IST

गत सहा वर्षात पाणीसाठ्याने गाठलेली सांडवा पातळी

कोयनानगर : गतवर्षी पावसाचे प्रमाण कमी असल्याने कोयना धरणाच्या वक्र दरवाजातून पाण्याचा विसर्ग करण्याची स्थिती उद्भवली नाही. १७ ऑक्टोबर २०२२ ला बंद करण्यात आलेले वक्र दरवाजे तब्बल एकवीस महिन्यानंतर गुरुवारी सायंकाळी उघडण्यात आले.कोयना धरणाच्या पाणीपातळीत मागील काही दिवसांत मोठ्या प्रमाणात वाढ होत असून गुरुवारी सकाळी पाणीसाठ्याने सांडवा पातळी गाठली आहे. धरणातील आवक वाढत राहिल्याने पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी वक्र दरवाजातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.कोयना धरण परिसरात गत आठ-दहा दिवसापासून तळ ठोकून बसलेल्या पावसाने धरणाच्या पाणीसाठ्यात उच्चांकी वाढ केली असून जुलै महिन्यात पंचवीस दिवसात सुमारे ५५ टीएमसी पाण्याची आवक झाली आहे. पावसाचे प्रमाण असेच राहिले तर काही दिवसात धरण पूर्ण क्षमतेने भरू शकते.

गुरुवारी सायंकाळी पाच वाजताच्या आकडेवारीनुसार धरणातील पाणीसाठा ७८.२१ टीएमसी तर पाणीपातळी २१३९ फूट ६५२ मीटर झाल्याने धरणाची सांडवा पातळी ७३.१८ टीएमसी पार केली आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने आवक ८५ हजार क्युसेकवर पोहोचली असून चालू तांत्रिक वर्षातील उच्चांकी आहे.

धरणाचे सहा वक्र दरवाजे गुरुवारी सायंकाळी दीड फुटाने उघडून १० हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग कोयना नदीत सुरू केला आहे. तर दोन दिवसांपूर्वी पायथा वीजगृहातून सुरू केलेला १०५० क्युसेक असा एकूण ११ हजार ५० क्युसेक पाण्याचा विसर्ग नदी पात्रात सुरू आहे. पावसाचा जोर काहीसा कमी झाला असला तरी ओढे, नाले व कोयना नदीच्या उपनद्यांचे पाणी पात्राबाहेर असलेने कोयना नदीपात्र विस्तीर्ण होणार असून नदीकाठच्या गावांना सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे.

गत सहा वर्षात पाणीसाठ्याने गाठलेली सांडवा पातळीसन २०१९ : ३० जुलै२०२० : ९ऑगस्ट२०२१ : २२ जुलै, २०२२ : ९ ऑगस्ट, २०२३ : १ ऑगस्ट२०२४ : २५ जुलै

गत पाच वर्षात सांडव्यातून विसर्ग२०१९ : ३ ऑगस्ट२०२० : १५ ऑगस्ट२०२१ : २३ जुलै२०२२ : १२ ऑगस्ट२०२३ : विसर्ग नाही२०२४ : २५ जुलैकोयना नदीच्या किनाऱ्यावर पूररेषा कोयना नदीच्या दोन्ही किनाऱ्यावर निळी व लाल पूररेषा आखण्यात आल्या असून यामधील निळी पूररेषा २५ वर्षाच्या आवर्ती पुराची उंची दर्शविते तर लाल पूररेषा १०० वर्षाच्या आवर्ती पुराची उंची दर्शविते.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरRainपाऊसKoyana Damकोयना धरण