शहरं
Join us  
Trending Stories
1
“आता गृह मंत्रालय घेतले, पुढे भाजपावाले नितीश कुमारांचे CM पद काढून घेतील”; कुणाचा दावा?
2
सोन्याच्या खाणीत गुंतवणूक करा, 5 वर्षांची कर सूट मिळवा; अफगाणिस्तानची भारताला मोठी ऑफर
3
“भावनिक वातावरण तयार करून मते मिळवण्याचा प्रयत्न”; राज ठाकरेंच्या विधानावर भाजपाचे उत्तर
4
जुना, वापरलेला फोन खरेदी करताय? थांबा! एका चुकीमुळे होऊ शकते हजारोंचे नुकसान, आताच जाणून घ्या..
5
रिलायन्स जिओला ग्राहक वैतागले! कॉलवेळी ऐकायलाच येत नाहीय..., प्रचंड समस्या, बीएसएनएल परवडले...
6
मोठा पेच...! धर्मेंद्र यांच्या ४५० कोटींच्या संपत्तीचे वारसदार कोण? दोन पत्नी, ६ मुले... 
7
Dharmendra Last Rites: देओल कुटुंबीयांचा आधार हरपला; अभिनेते धर्मेंद्र अनंतात विलीन, सनी देओलने दिला मुखाग्नी
8
"सरकारनं माझं ऐकलं नाही तर संसदेच्या छतावरून उडी मारेन"; जेव्हा राजकारणात दिसली धर्मेंद्र यांची 'शोले स्टाईल'
9
Women’s Kabaddi World Cup 2025: कबड्डीतही भारताच्या लेकी जगात भारी! सलग दुसऱ्यांदा जिंकली वर्ल्ड कप स्पर्धा
10
आधी कारने धडक, मग १९ सेकंदात १९ कुऱ्हाडीचे घाव; गुरुग्राममध्ये डिलिव्हरी बॉयवर जीवघेणा हल्ला!
11
आधुनिक तंत्रज्ञान, पूर्णपणे मेड इन इंडिया; भारतीय नौदलात ‘INS माहे’ची धमाकेदार एन्ट्री...
12
प्रेमात धोका! मिस कॉलने जोडले नाते, प्रियकराने तोडले! गर्भवती प्रेयसीचा गर्भपात करून स्टेशनवर सोडून पळाला
13
डॉ. गौरी गर्जे यांचा मृत्यू अनैसर्गिक; डॉक्टरांच्या खुलाशाने खळबळ, शवविच्छेदन अहवालात कोणत्या नोंदी?
14
"विश्वास ठेवा, दुसरा कुठलाही हेतू नाही" माओवाद्यांनी आत्मसमर्पणासाठी मागितली १५ फेब्रुवारीपर्यंतची वेळ
15
IND vs SA: टीम इंडियाच्या फलंदाजांची घसरगुंडी, दुसरीकडे करूण नायरची सूचक पोस्ट, म्हणाला...
16
गौरी पालवे मृत्यू प्रकरण: पती अनंत गर्जेंना २७ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी, काल झालेली अटक
17
'३० कॉटेजचे एक आलिशान रिसॉर्ट बांधायचेच राहिले...'; बिझनेसमन धर्मेंद्रची शेवटची इच्छा होती...
18
महिंद्रा-टाटासह 'या' कंपन्यांचे शेअर्स धडाधड कोसळले! बाजारात अचानक का वाढला विक्रीचा दबाव?
19
दिल्ली विमानतळावर मोठा अपघात टळला; अफगाणिस्तानातून आलेल्या विमानाची चुकीच्या रनवेवर लँडिंग
20
IND vs SA 2nd Test Day 3 Stumps : बावुमानं टीम इंडियाला फॉलोऑन देणं टाळलं; कारण...
Daily Top 2Weekly Top 5

संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील बबन भरगुडे यांचा प्रशासनाला विसर, पळशीत स्मारक उभारण्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2025 17:13 IST

प्रशासकीय इमारतीमध्ये हुतात्मा बबन भरगुडे यांचा फोटो असलेली फ्रेम अडगळीत असल्याचेही निदर्शनास आले

मुराद पटेलशिरवळ : राज्य पुनर्रचना आयोगाने महाराष्ट्राला मुंबई देण्यास नकार दिल्यानंतर २१ नोव्हेंबर १९५६ रोजी मराठी बाण्याची मुंबई या अन्यायाने पेटून उठली. संयुक्त महाराष्ट्र आंदोलनामध्ये १०७ हुतात्म्यांनी बलिदान दिल्यानंतर मुंबई महाराष्ट्राची राजधानी झाली. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत बलिदान दिलेल्या हुतात्म्यांचे स्मरण करण्यासाठी हुतात्मा स्मृतिदिन साजरा केला जातो. मात्र, पळशीतील हुतात्मा बबन भरगुडे यांचा प्रशासनाला विसर पडला आहे. ६९ वर्षांमध्ये एकानेही अभिवादन करण्याची तसदी घेतलेली नाही. यामुळे संताप व्यक्त केला जात आहे.याबाबत माहिती अशी की, २१ नोव्हेंबर १९५६ ते १ मे १९६० या काळात राज्य पुनर्रचना आयोगाने महाराष्ट्राला मुंबई देण्यास नकार दिला. यानंतर मुंबईमधील संघटित कामगार व मराठी भाषिकांसहित मोर्चा काढला. फ्लोरा फाउंटेन परिसरात आला असता तणावाचे वातावरण पसरले होते. या आंदोलनात तब्बल १०७ हुतात्म्यांनी बलिदान देत महाराष्ट्राला १ मे १९६० रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना तत्कालीन सरकारला करावी लागली. १०७ हुतात्म्यांनी जीवाची बाजी लावली त्याठिकाणी १९६५ मध्ये उभारलेले हुतात्मा स्मारक आजही या लढ्याची साक्ष देत आहे. यामध्ये खंडाळा तालुक्यातील पळशीचे सुपुत्र बबन बापू भरगुडे यांनी बलिदान दिले.मात्र, यानंतर तब्बल ६९ वर्षे प्रशासनासह लोकप्रतिनिधींना त्यांची आठवण आलेली नाही. २१ नोव्हेंबर २०२५ रोजी गटविकास अधिकारी अनिल वाघमारे हे सहकाऱ्यांसमवेत शिरवळ येथे भूमिपूजनाला आले. दुसरीकडे शिरवळपासून केवळ एक ते दोन किलोमीटरवर असणाऱ्या पळशी याठिकाणी जाऊन हुतात्मा भरगुडे यांना हुतात्मा दिनाचे औचित्य साधून अभिवादन करण्याची त्यांनी तसदी घेतली नाही. याबाबत गटविकास अधिकारी वाघमारे यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता होऊ शकला नाही.

प्रतिमाही अडगळीतविशेष म्हणजे, प्रशासकीय कारभार हाकणाऱ्या एका प्रशासकीय इमारतीमध्ये हुतात्मा बबन भरगुडे यांचा फोटो असलेली फ्रेम अडगळीत असल्याचेही निदर्शनास आले आहे.

पळशीचे सुपुत्र हुतात्मा बबन भरगुडे यांचे कार्य खंडाळा तालुक्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. त्यांच्या कार्याचा गौरव करणारा व आजच्या पिढीला आदर्शवत असे स्मारक व स्वागत कमान उभारल्यास त्यांच्या कार्याचा उचित सन्मान होईल. याकरिता पळशी ग्रामपंचायतीच्या मासिक सभेमध्ये ठरावही घेतला असताना प्रशासनाकडून कोणतीही दखल घेतली जात नाही. - नवनाथ भरगुडे, ग्रामपंचायत सदस्य, पळशी

English
हिंदी सारांश
Web Title : Forgotten Hero: Demand for Baban Bhargude Memorial in Palshi

Web Summary : Baban Bhargude, a martyr of the Samyukta Maharashtra movement, is forgotten by administration. Palshi villagers demand a memorial after 69 years, expressing outrage at the neglect.