शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
3
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
4
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
5
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
6
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
7
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
8
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
9
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
10
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
11
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
12
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
13
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
14
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
15
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
16
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
17
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
18
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
19
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

Friendship Day: शेतातला शिवज्या अन् सिनेमातल्या सयज्याची दोस्ती!, विमानवारी घडविली

By जगदीश कोष्टी | Updated: August 4, 2025 17:34 IST

मित्र्याच्या हाकेला ओ देत शिवाजी पण गेला. विमानातून प्रवास घडविला.

जगदीश कोष्टीसातारा : लहानपण निरागस असतं. मित्र-मैत्रिणी सतत भांडतात अन् काही वेळानं एकत्र खेळायलाही लागतात. हे नातं कोणत्याही अपेक्षांच्या पलीकडं असतं; पण त्यातीलच एकजण मोठा झाला तर संपत्तीची बाधा होते अन् मैत्रीत अंतर पडायला लागतं. याला अपवाद ठरली अभिनेते सयाजी शिंदे आणि शिवाजी शिंदे यांची मैत्री. शिवज्या-सयज्याने साठ वर्षांपासून ही मैत्री जपली आहे.अभिनेते सयाजी शिंदे आणि शिवाजी शिंदे हे पहिलीपासून एकाच वर्गात. दोघांमध्ये शिवज्या हे सयज्यापेक्षा पाच वर्षांनी मोठे; पण ते एकत्रच वाढले. शेतात काम करत होते; पण दोघांच्याही घरची परिस्थिती बेताची असल्याने सयाजी सातवीनंतर फलटण तालुक्यातील हाडगुड येथे बहिणीकडे शिकायला गेले. तर शिवाजी मात्र तेथेच राहिले. कण्हेरमध्ये त्यांनीही दहावीपर्यंत शिक्षण घेतलं. तेव्हाच्या काळात मोबाइल नव्हता; पण त्यांच्यातील मैत्री कायम होती. शाळेला सुटी लागल्यावर गावच्या यात्रेला सयाजी गावी येत. यात्रेत होणाऱ्या नाटकातही ते एकत्र काम करत होते. सयाजी शिंदे हे सिनेक्षेत्रातील मोठं नाव आहे. हिंदी, मराठी तसेच दाक्षिणात्य चित्रपटात ते काम करत असतात. सामाजिक क्षेत्रातही त्यांचे काम सुरू असले तरी जुन्या मित्राला ते विसरलेले नाहीत.विमानवारी घडविलीएकेदिवशी शिवाजी शेतात काम करत होते तेव्हा सयाजीचा फोन आला. सयाजी म्हणाले, ‘शिवज्या काय करतोयस रं. किती दिवस शेती करणार. चार कपडे घे अन् ये पुण्याला. आपण कोलकात्याला जाऊ.’ मित्र्याच्या हाकेला ओ देत शिवाजी पण गेला. अशा प्रकारे पंधरा दिवस फिरवले. विमानातून प्रवास घडविला. बदलत्या जगाचा अनुभव घडविला.

सिनेमा, रीलमधील हिरोसयाजी शिंदे यांनी शिवज्याला अनेक ठिकाणी फिरवलं. चित्रीकरण दाखविलं. तसंच ‘उंटावरचा शहाणा’ या चित्रपटात छोटीशी भूमिकाही दिली. समाजमाध्यमावर शिवज्या-सयज्याचे अनेक रील आहेत. ते प्रचंड व्हायरल होत आहेत.

सयाजी कितीही मोठा झाला असला तरी आम्ही मनाने एकच आहोत. त्याला नाटक करताना एखाद्या शब्दाचा अर्थ समजला नाही तर फोन करून विचारतो. तसंच मला बाहेर फिरवून जग पाहण्याची संधी मिळाली. - शिवाजी शिंदे, वेळेकामथी