शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

कलेढोण येथे अवैद्य वाळूवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 15:27 IST

sand Crimenews Satara : खटाव तालुक्यातील कलेढोण येथील विटा-कलेढोण मार्गावर अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरवर मायणी पोलिसांनी कारवाई करून ७ लाख २१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तसेच दोघांना अटक केली आहे, अशी माहिती पोलीस उपनिरीक्षक शहाजी गोसावी यांनी दिली.

ठळक मुद्देकलेढोण येथे अवैद्य वाळूवर कारवाई दोघांना अटक : सात लाखांचा मुद्देमाल जप्त

मायणी : खटाव तालुक्यातील कलेढोण येथील विटा-कलेढोण मार्गावर अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरवर मायणी पोलिसांनी कारवाई करून ७ लाख २१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तसेच दोघांना अटक केली आहे, अशी माहिती पोलीस उपनिरीक्षक शहाजी गोसावी यांनी दिली.याबाबत माहिती अशी की, विटा-कलेढोण मार्गावर कलेढोण हद्दीतून डंपरमधून अवैद्य वाळू वाहतूक रात्रीच्यावेळी सुरू असल्याची माहिती गोपनीय सूत्रांकडून पोलिसांना मिळाली. त्यानंतर उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. निलेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शहाजी गोसावी, पोलीस कॉन्स्टेबल बाबुराव खांडेकर, नवनाथ शिरकुळे, प्रकाश कोळी, होमगार्ड रोहित घाडगे यांनी कलेढोण गावातील श्री खंडोबा मंदिराच्या तेथे सापळा लावला. त्यावेळी विटा-कलेढोण मार्गावरून माहिती मिळालेले वाहन (एमएच १२ सीटी ९७९४) येताना दिसले.

संबंधित वाहन थांबविल्यानंतर वाहनाबाबत चौकशी केली असता यामध्ये विनापरवाना वाळू वाहतूक सुरू असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर डंपर चालक सचिन मधुकर माने (वय २३, रा. घाणंद ता. आटपाडी जि. सांगली) व अमोल रामचंद्र जुगदर (वय ३२, रा. जांभुळणी ता. आटपाडी) या दोघांना अटक केली. त्यांच्याकडून डंपर किंमत ७ लाख व डंपर मधील अवैध वाळू ३ ब्रास २१ हजार रुपये असा एकूण ७ लाख २१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या घटनेची नोंद मायणी पोलीस दूरक्षेत्रात झाली असून पोलीस उपनिरीक्षक शहाजी गोसावी तपास करत आहेत.

टॅग्स :sandवाळूPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीSatara areaसातारा परिसर