शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
2
"स्मृती इराणींना निवडणुकीनंतर गोव्यात पाठवणार, गांधी परिवार कोणाला घाबरत नाही"
3
रिकामे झाले, दुसरीकडे काम, भाजपचा फॉर्म्युला; अनेक नेत्यांना दुसऱ्या मतदारसंघात पाठवले
4
...म्हणून काँग्रेसने राहुल गांधींना अमेठी ऐवजी रायबरेलीतून दिली उमेदवारी, असं आहे मतांचं गणित
5
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
6
संविधान बदलणार बाेलले अन् पक्षाने तिकीट कापले; विश्वेवर हेगडे-कागेरी यांना उमेदवारी
7
मोबाइल चोरी नाहीच; पण, मृत्यूचे गूढ कायम; विशाल पवार संशयास्पद मृत्यू प्रकरण
8
PPF Vs NPS: रिटायरमेंटसाठी कोणता प्लान ठरेल बेस्ट? 'हे' आहेत पीपीएफ आणि एनपीएसचे फायदे
9
एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला विरोध कशाला असेल ? वार्तालापात विनाेद तावडे यांनी मांडली भूमिका
10
भाजप अन् काँग्रेससमोर ‘पिंचहिटर’चे आव्हान ; पठाणच्या ‘एन्ट्री’मुळे देशाच्या नजरा
11
Wipro चे संस्थापक अझीम प्रेमजी बँकिंग क्षेत्रात उतरणार; 'या' बँकेतील हिस्सा खरेदी करण्याच्या तयारीत
12
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
13
अमेठीत २५ वर्षांत प्रथमच मैदानात नसेल गांधी घराणे; बालेकिल्ल्यातून काॅंग्रेसने उमेदवार बदलला, भाजप नेत्यांचे टीकास्त्र
14
उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायचे विचारपूस ; पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू
15
Akshaya Tritiya 2024: चैत्रगौरीला निरोप देताना कुंकवाची पावलं काढा आणि 'पुनरागमनायच' म्हणा; कारण...
16
खासदारांना डावलून आमदार रिंगणात, नव्या चेहऱ्यांमुळे चुरस; रणनीती ठरणार का यशस्वी?
17
'ही' साऊथ अभिनेत्री, जी प्रेमासाठी बनली वयानं २७ वर्ष मोठ्या असलेल्या माजी CM ची दुसरी पत्नी
18
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
19
रावसाहेब दानवे षटकार मारणार ? जालन्यात चुरशीची लढाई, भाजपचा वरचष्मा; मविआ कमकुवत!
20
तिकीट तर कापले, आता पुनर्वसनाचा प्रश्न, महायुतीने १२ विद्यमान खासदारांना बसवले घरी

दहा वर्षांपासून फरार असलेला आरोपी अटकेत -भेसळप्रकरणी फलटणमधील दोन व्यापाºयांना कैद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 06, 2019 12:09 PM

खंडाळा येथे चोरीप्रकरणी जामिनावर सुटल्यानंतर गेल्या दहा वर्षांपासून फरारी असलेल्या आरोपीला खंडाळा पोलिसांनी मोठ्या  शिताफीने पुरंदर येथे सापळा लावून अटक केली

ठळक मुद्दे: ३ हजार रुपयांचा दंड ठोठावला

शिरवळ : खंडाळा येथे चोरीप्रकरणी जामिनावर सुटल्यानंतर गेल्या दहा वर्षांपासून फरारी असलेल्या आरोपीला खंडाळा पोलिसांनी मोठ्या  शिताफीने पुरंदर येथे सापळा लावून अटक केली.  

खंडाळा येथे २००९ मध्ये घरफोडी झाली होती. यावेळी खंडाळा पोलिसांनी चोरीप्रकरणी आंबळे, ता.पुरंदर जि. पुणे येथील गणेश पांडुरंग दरेकर याला जेरबंद केले होते. दरम्यान दरेकर हा न्यायालयामधून जामिनावर मुक्त झाल्यापासून न्यायालयात हजर राहत नव्हता. त्याच्यावर वेळोवेळी अटक वाँरट काढण्यात आले होते. मात्र, तो सापडत नव्हता. गुन्हा घडल्यापासून त्याचे राहते मूळगाव त्याने सोडले होते. 

 दरम्यान , सासवड ता. पुरंदर येथे कचेरीमध्ये दस्तऐवज करण्यासाठी गणेश दरेकर येणार असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक हणुमंत गायकवाड यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी गणेश दरेकर याचा शोध घेण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक महेश कदम ,पोलीस हवालदार भगवंत मुठे , सचिन वीर, प्रशांत धुमाळ, सुभाष धुळे ,बालाजी वडगावे यांच्या पथकाला सूचना केल्या. या पथकाने सासवड ता. पुरंदर येथे सापळा लावला. गणेश दरेकर येताच या टीमने झडप घालून त्याला अटक केली. याबाबत अधिक तपास हवालदार सचिन वीर हे करत आहेत.

 

भेसळप्रकरणी फलटणमधील दोन व्यापाºयांना कैद -लवंगमध्ये आढळला होता दोष सातारा : फलटणच्या किराणा स्टोअर्समध्ये अप्रमाणित अन्नसाठा आढळल्याने फलटण येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांनी अन्न भेसळ प्रतिबंधित कायद्यान्वये दुकानदारास व पुरवठादारास प्रत्येकी ३ हजार दंड व १५ दिवसांच्या कैदेची शिक्षा सुनावल्याची माहिती सातारचे सहायक आयुक्त (अन्न) शि.वा. कोडगीरे यांनी दिली.तत्कालीन अन्न निरीक्षक बी.एम. ठाकूर  सातारा यांनी ५ फेब्रुवारी २0१0 रोजी  सुनील जयसिंगराव ढेंबरे, मे. सरस्वती  किराणा स्टोअर्स, कसबा पेठ, फलटण यांच्या दुकानातून अन्न भेसळ प्रतिबंधित कायद्यान्वये लवंग हा अन्नपदार्थ विश्लेषणासाठी घेतला होता. लवंगामध्ये तपासणीअंती दोष आढळून आल्याने अप्रमाणित घोषित करण्यात आला होता. यानुसार प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी फलटण यांच्या न्यायालयात खटला दाखल करण्यात आला होता. 

या खटल्यामध्ये दुकानदार सुनील जयसिंगराव ढेंबरे व पुरवठादार व पॅकर शाम धरमचंद अगरवाल यांना प्रत्येकी दंड रु. ३ हजार ठोठावला असुन प्रत्येकी १५ दिवसांच्या कैदेची शिक्षा सुनावली आहे. याप्रकरणी शि.वा. कोडगीरे, सहायक आयुक्त (अन्न) सातारा यांचे मार्गदशनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी मे.स.पवार व विकास सोनवणे यांनी यशस्वी पाठपुरावा केला होता.     

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSatara areaसातारा परिसर