तक्रारदारच ठरला आरोपी

By Admin | Updated: March 5, 2017 02:01 IST2017-03-05T02:01:01+5:302017-03-05T02:01:01+5:30

माणगाव-पुणे दरम्यानच्या ताम्हणी घाटात बुधवारी चार दरोडेखोरांनी मारहाण करून, कोयत्याचा धाक दाखवून १२ लाखांचा ऐवज लंपास केल्याप्रकरणी माणगाव पोलीस ठाण्यात

The accused was the accused | तक्रारदारच ठरला आरोपी

तक्रारदारच ठरला आरोपी

- जयंत धुळप, अलिबाग

माणगाव-पुणे दरम्यानच्या ताम्हणी घाटात बुधवारी चार दरोडेखोरांनी मारहाण करून, कोयत्याचा धाक दाखवून १२ लाखांचा ऐवज लंपास केल्याप्रकरणी माणगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करणारा संदीप दरेकर हाच आरोपी असल्याचे पोलिसांनी अवघ्या २४ तासांत उघडकीस आणले.
१ मार्च रोजी संध्याकाळी सुतारवाडी, भालेमार्गे माणगाव येथे बोलेरोने जात असताना भाले ते चांदेवादी रस्त्यावर दुचाकीवरून चार व्यक्ती आल्या. त्यांनी गाडी अडवून मारहाण करून कोयत्याचा धाक दाखवून बोलेरो आणि ७ लाख २० हजारांची रोख रक्कम, तसेच इतर सामान असा एकूण १२ लाख ४ हजारांचा ऐवज लंपास केल्याची तक्रार संदीपने केली होती. त्यानुसार गुन्हा दाखल झाला. तक्रारदार दरेकर व त्याचा एक मित्र याची सखोल तपास केला असता, दरेकर यांनीच खोटा बनाव करून तक्र ार केल्याचे त्यांनी सांगितले. बोलेरो जीप ताम्हणी घाटात रस्त्यालगत नेऊन उभी करून, मोबाइल जंगल भागात फेकून दिल्याचे दरेकरने कबूल केले.

Web Title: The accused was the accused