दुचाकी चोरी करणारा आरोपी गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:29 IST2021-05-28T04:29:00+5:302021-05-28T04:29:00+5:30

नागठाणे : मागीलवर्षी ऑक्टोबर महिन्यात दुचाकी चोरी करणारा आरोपी बोरगाव पोलिसांनी गजाआड केला. नूर महंमद चांदसाहब मुल्ला (वय ...

Accused of stealing a bike is missing | दुचाकी चोरी करणारा आरोपी गजाआड

दुचाकी चोरी करणारा आरोपी गजाआड

नागठाणे : मागीलवर्षी ऑक्टोबर महिन्यात दुचाकी चोरी करणारा आरोपी बोरगाव पोलिसांनी गजाआड केला. नूर महंमद चांदसाहब मुल्ला (वय २८, रा. गांधीनगर, सदगाडचेशेजारी, ता. जि. विजापूर, कर्नाटक) असे आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून (एमएच १० डीएच ६५८९) ही दुचाकी हस्तगत करण्यात आली आहे.

याबाबत बोरगाव पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, २७ सप्टेंबर २०२० रोजी सकाळी १०.३० च्या सुमारास गांधीनगर काशीळ (ता. सातारा) येथून दत्तात्रय मोरे यांची दुचाकी गाडी चोरट्याने लांबविली होती. याबाबतची फिर्याद भालचंद्र राजाराम चंद (रा. फाळकेवाडी ता. वाळवा, जि. सांगली) यांनी ६ ऑक्टोबर २०२० रोजी बोरगाव पोलीस ठाण्यात दिली होती. त्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक डॉ. सागर वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस उपनिरीक्षक वर्षा डाळिंबकर आणि त्यांचे पथक गुन्हेगारांच्या मार्गावर लक्ष ठेवून सतर्क होते. त्या अनुषंगाने तपास करताना आरोपी हा सातारा जिल्ह्यात दुचाकी घेऊन येणार असल्याची गुप्त माहिती डॉ. सागर वाघ यांना मिळाली. त्या दृष्टीने सापळा रचून बोरगाव पोलिसांनी आरोपीस सातारा येथून ताब्यात घेऊन चोरीस गेलेली दुचाकी हस्तगत केली आणि आरोपीस घेतले.

Web Title: Accused of stealing a bike is missing