शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदींना जिरेटोप घातल्याने वादंग; टीकेनंतर प्रफुल्ल पटेलांनी शिवप्रेमींना दिला 'हा' शब्द
2
निवडणूक प्रचारात कांद्यासाठी आंदोलनाची घोषणा; पण लंकेंनी आता शेतकऱ्यांना केलं नवं आवाहन!
3
"आमच्या घरी ईद साजरी केली जायची"; पंतप्रधान मोदींनी सांगितला मुस्लिम शेजाऱ्यांचा किस्सा
4
12वी पास कंगनाकडे कोट्यवधींचे हीरे, एकाच दिवसात खरेदी केल्या LIC च्या 50 पॉलिसी, जाणून घ्या किती आहे संपत्ती?
5
मराठमोळ्या अभिनेत्रीला झालाय गंभीर आजार, व्हिडिओ शेअर करत म्हणाली, 'मी प्रेग्नंट नाही...'
6
गंभीर हसल्याशिवाय क्रशला प्रपोज करणार नाही; तरूणीच्या पोस्टरला भारतीय दिग्गजाचं उत्तर
7
PM Modi Net Worth: कोणत्या बँकेत आहे PM नरेंद्र मोदींचं खातं, कुठे आहे गुंतवणूक? पाहा डिटेल्स
8
सत्तापिपासून भाजपा मृतदेहांवरून रॅली काढतंय का? मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून काँग्रेसचा जळजळीत सवाल
9
'लोकांचा जीव जातोय आणि हिला डान्स सुचतोय'; पाऊस पडल्यानंतर रील केल्यामुळे मन्नारा चोप्रा ट्रोल
10
'नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा नक्कीच पंतप्रधान होतील, आम्हालाही त्यांच्यासारख्या नेत्याची गरज; पाकिस्तानी अब्जाधीशांनी केले कौतुक
11
Kangana Ranaut : "तुम्ही मला एकदा मारलंत तर अनेक वेळा..."; कंगना राणौतचं विक्रमादित्य सिंहांवर टीकास्त्र
12
'अनिल कपूरसारखा पती नको' असं का म्हणाली होती माधुरी दीक्षित? इंटरेस्टिंग आहे यामागचं कारण
13
IPL Playoffsच्या २ जागांसाठी ५ संघ शर्यतीत; SRH ला ८७.३%, CSK ला ७२.७% टक्के चान्स, तर RCBला...
14
राज ठाकरेंच्या पाठिंब्यानं महायुतीला बळ; भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे 'शिवतीर्थ'वर
15
Video - ना स्ट्रेचर, ना कोणाची मदत; आजारी वडिलांना उचलून घेऊन रुग्णालयात फिरत राहिला लेक
16
सूर्यावर भीषण स्फोट; ISROच्या आदित्य L-1 आणि चांद्रयान-2 च्या कॅमेऱ्यात कैद
17
IPL मुळे भारताच्या वाट्याला T20 WC पूर्वी १ सराव सामना; दोन बॅचमध्ये संघ अमेरिकेला जाणार
18
सांगलीच्या निर्णयात घाई केली; भाजपा प्रवेशाबाबत विश्वजित कदमांचं मोठं विधान
19
SBI'ने ग्राहकांना दिली भेट! एफडीवरील व्याजदरात केली मोठी वाढ, पाहा नवे दर
20
Corona Virus : चिंताजनक! भारतात आला कोरोनाचा नवा व्हेरिएंट; 'ही' आहेत लक्षणं, लोकांसाठी किती धोकादायक?

घर बांधणे आवाक्याबाहेर; वाळू पुन्हा महागणार

By दीपक देशमुख | Published: February 27, 2024 12:17 PM

शासनाचे सुधारित वाळू धोरण : निविदेनुसार ठरणार दर

दीपक देशमुखसातारा : सरकारने गेल्या वर्षी नवीन वाळू धोरण आणून घरे बांधण्याची स्वप्न पाहत असलेल्या सर्वसामान्यांना आशेचा किरण दाखवला होता. मात्र, आता पुन्हा नवीन वाळू धोरण आणून गरिबांच्या या आशेवर पाणी फिरवले आहे. नवीन धोरणानुसार गोरगरिबांना वाळू आता सहाशे रुपयांना मिळणार नाही. वाळूच्या डेपोनिहाय निविदा काढण्यात येऊन निविदा दर, रॉयल्टी, जिल्हा खनिज प्रतिष्ठान रक्कम व इतर देय रकमा मिळून वाळूचा दर ठरणार असून, ही किंमत आता सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जाऊ शकते.

नदीपात्रातील गाळ, गाळमिश्रित वाळू काढणे, धरणातील गाळ काढला जाऊन राज्यातील पूर परिस्थितीचा धोका कमी करणे, नदीचा प्रवाह सुरळीत करणे आदी बाबींसाठी शासनाने २८ जानेवारी २०२२ रोजी नवीन सुधारित वाळू व रेती धोरण बनविले होते. यातून उपलब्ध झालेली वाळू नागरिकांना स्वस्त दराने उपलब्ध करून देणे व अनधिकृत उत्खननास आळा घालण्याच्या उद्देशाने उत्खनन, साठवणूक व्यवस्थापन व ऑनलाइन विक्री करण्याबाबतचे सर्वंकष धोरण शासन निर्णय १९ एप्रिल २०२३ पासून १ वर्षासाठी प्रायोगिक तत्त्वावर राबवले होते. त्याला सर्वसामान्यांकडून चांगला प्रतिसाद मिळाला होता.या प्रायोगिक धोरणाची मुदत एप्रिलमध्ये संपणार आहे. त्यानंतर ही वाळू पूर्वीप्रमाणे सहाशे रुपये प्रति ब्रास यानुसार असणार नाही. नवीन धोरणानुसार प्रत्येक निविदेच्या किमतीनुसार वाळूचा दर ठरणार आहे. सध्या साधारणपणे वाळूचा दर प्रतिटन ५०० रुपयांच्या आसपास म्हणजेच प्रति ब्रास २९०० ते ३००० पर्यंत होऊ शकतो. यामध्ये स्वामित्वधन (राॅयल्टी) आणि जिल्हा खनिज प्रतिष्ठान निधीची रक्कम व इतर देय रकम मिळून हा खर्च तीन ते साडेतीन हजारांपर्यंत जाऊ शकतो. शिवाय वाहतुकीचा खर्च लाभार्थ्यानेच करायचा आहे.असा ठरणार निविदेचा दरवाळूचे उत्खनन, उत्खननानंतर वाळूची डेपोपर्यंत वाहतूक, भराई व उतराईचा खर्च, डेपो निर्मिती व व्यवस्थापन या बाबींवरील होणारा खर्च गृहीत धरून प्रति मेट्रिक टन याप्रमाणे एकच निविदा काढण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

घर बांधणे आवाक्याबाहेरसध्या घर बांधणे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहे. मुळात मोकळ्या जागा, प्लॉट यांच्या किमती गगनाला भिडू लागल्या आहेत. जमीन खरेदीसाठीच मोठी जमा पुंजी घालावी लागते. यानंतर घर बांधायला घेण्यासाठी खर्चाची जुळवाजुळव करेपर्यंत कित्येक वर्षे जमीन पडून असते.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरsandवाळू