अपशिंगे येथील जवानाचा अपघाती मृत्यू

By Admin | Updated: July 25, 2014 23:33 IST2014-07-25T23:19:11+5:302014-07-25T23:33:27+5:30

रेल्वेखाली सापडला : उत्तर प्रदेशमधील गाझियाबाद येथील घटना

Accidental death of Apache | अपशिंगे येथील जवानाचा अपघाती मृत्यू

अपशिंगे येथील जवानाचा अपघाती मृत्यू

कडेगाव : अपशिंगे (ता. कडेगाव) येथील जवान गौरव जगन्नाथ सूर्यवंशी यांचा गाझियाबाद (उत्तर प्रदेश) येथे अपघाती मृत्यू झाला. भारतीय सैन्यदलामध्ये पतियाळा (पंजाब) येथे तांत्रिक विभागात कार्यरत असलेले गौरव गाझियाबाद येथे सैन्यदलातील गाड्या दुरुस्त करण्यासाठी गेले होते. यावेळी गाझियाबाद येथे मंगळवारी रेल्वेमार्ग ओलांडताना रेल्वेखाली सापडल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. आज, शुक्रवारी अपशिंगे येथे शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
गौरव सूर्यवंशी त्यांच्या अन्य चार सहकाऱ्यांसह गाझियाबाद (उत्तर प्रदेश) येथे सैन्यदलातील गाड्या दुरुस्त करण्यासाठी गेले होते. गौरव व त्यांचे सहकारी गाझियाबादमध्ये रहात होते. तेथून जवळच रेल्वेमार्ग आहे. दरम्यान, गौरव व त्यांचे सहकारी रेल्वेमार्ग ओलांडत होते. यावेळी सर्वात पुढे असलेले गौरव सूर्यवंशी रेल्वेखाली सापडले. पाठीमागे राहिलेले त्यांचे सहकारी सुदैवाने बचावले. ही घटना मंगळवार दि. २२ जुलैरोजी सायंकाळी ५ च्या सुमारास घडली.
आज, शुक्रवारी सकाळी आठ वाजता गौरव यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. गौरव यांच्या पश्चात आई, वडील, दोन बहिणी असा परिवार आहे. (वार्ताहर)

Web Title: Accidental death of Apache

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.