शहरं
Join us  
Trending Stories
1
'यशस्वी' सेंच्युरी... 'रो-को'ची फिफ्टी! टीम इंडियानं दाबात जिंकली दक्षिण आफ्रिकेविरुद्धची वनडे मालिका
2
“संवैधानिक मुल्ये पायदळी तुडवणाऱ्या शक्तींविरोधात संघर्ष करण्याची वेळ”: हर्षवर्धन सपकाळ
3
Yashasvi Jaiswal Century : आधी कसोटी खेळला! मग टी-२० स्टाईलमध्ये साजरी केली वनडेतील पहिली सेंच्युरी
4
Uddhav Thackeray : ​​​​​​​"...तर उपमुख्यमंत्रीपद रद्द करा", उद्धव ठाकरे यांची सरकारकडे मोठी मागणी
5
'लाडकी बहिण योजना' सर्वात जास्त 'लाडकी'! ४६% पुरुषांचाही महिलांच्या आर्थिक उन्नतीला पाठिंबा
6
अबतक २००००! हिटमॅन रोहित शर्मानं रचला इतिहास; आंतरारष्ट्रीय क्रिकेटमध्ये गाठला मैलाचा पल्ला
7
एकनाथ शिंदेमुळेच भाजपा पुन्हा सत्तेत, ताकदवान व्हायला उठावच कारणीभूत - शंभूराज देसाई
8
अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सादर होतील हजारो कोटींच्या पुरवणी मागण्या; ८ डिसेंबरपासून अधिवेशनाला सुरवात
9
अरे बापरे! Grok वापरणाऱ्यांनो सावधान; लोकांच्या घराचे पत्ते, पर्सनल माहिती लीक, प्रायव्हसी धोक्यात
10
IND vs SA : कुलदीप KL राहुलकडे DRS चा हट्ट धरायला गेला, मग हिटमॅन रोहित 'कॅप्टन' झाला अन्... (VIDEO)
11
एलॉन मस्क यांच्या 'X' ला तब्बल १०८० कोटींचा दंड ! 'ब्लू टीक' संदर्भातील प्रकरणात बसला दणका
12
GenZमध्ये महाराष्ट्र सरकारची कार्यशैली लोकप्रिय; ६७% तरुणाईला देवेंद्र फडणवीसांवर 'विश्वास'
13
मार्गशीर्ष संकष्ट चतुर्थी २०२५: ‘या’ ५ गोष्टी अवश्य अर्पण करा; गणपतीची कायम कृपा मिळवा!
14
'बिनशर्त माफी मागा, अन्यथा पाच कोटींचा दावा ठोकणार' महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माजी मंत्री सुलेखा कुंभारे यांना नोटीस
15
Aaditya Thackeray : "साधुग्राम, तपोवन हवा पण भाजपाच्या बिल्डर मित्रांची दादागिरी नाही", आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
16
२०२६ला ६ महिन्यातच सगळी संकटे समस्या दूर होतील; संकष्ट चतुर्थीपासून ‘ही’ उपासना सुरू करा!
17
महामानवाला अभिवादन! CM फडणवीसांनी केली सरणत्तयं प्रार्थना; PM मोदींनीही वाहिली आदरांजली
18
समस्या संपत नाहीत, पैसा राहत नाही? गणेशाचे प्रभावी स्तोत्र ११ वेळा म्हणा; अद्भूत अनुभव घ्या!
19
America Visa : सोशल मीडियावर एक चूक कराल, तर तुमच्यासाठी बंद होतील अमेरिकेचे दरवाजे! काय आहे नियम?
20
२०२५ ची शेवटची संकष्ट चतुर्थी: ५ उपाय अवश्य करा, चिंतामुक्त व्हा; बाप्पाची अपार कृपा लाभेल!
Daily Top 2Weekly Top 5

Satara: ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॉलीचा डाबर अचानक तुटला... ट्रॅक्टर पुलाच्या कठड्यावर चढला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2025 18:00 IST

चालकाने दाखविले प्रसंगावधान : अनर्थ टळला

कराड : कराड-रत्नागिरी महामार्गावरील ओंड–उंडाळे दरम्यान असलेल्या तुळसण पुलावर शुक्रवारी ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरचा भीषण अपघात झाला. अचानक पाठीमागील ट्रॉलीचा डाबर तुटल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि वेगात असलेला ट्रॅक्टर सरळ पुलाच्या कठड्यावर जाऊन अडकला. मात्र चालकाने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे त्याचा जीव शर्थीने वाचला.याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, शेवाळेवाडी (म्हासोली), ता. कराड येथील अथणी शुगर्स-रयत युनिट सहकारी साखर कारखान्याकडे ऊस घेऊन जाणारा हा ट्रॅक्टर तुळसण पुलावर आल्यानंतर अचानक ट्रॅक्टरच्या पाठीमागील ट्रॉलीचा डाबर तुटला. यामुळे धडधडत्या ट्रॅक्टरवरील नियंत्रण मिळवण्यासाठी चालकाने प्रयत्न केले, परंतु तोपर्यंत ट्रॅक्टर पुलाच्या कठड्याला धडकून अर्धवट लटकलेल्या अवस्थेतच थांबला. काही क्षणातच अपघात एखाद्या थरारपटातील दृश्याप्रमाणे भीषण चित्र निर्माण करणारा ठरला.दरम्यान, पुलाचा कठडा कोसळून ट्रॅक्टर व उसाने भरलेली ट्रॉली खाली सुमारे ५० ते ६० मीटर खोल असलेल्या ओढ्यात कोसळण्याचा धोका निर्माण झाला होता. मात्र ट्रॅक्टर कठड्यात अडकून राहिला आणि चालकाने शांतपणे बाहेर पडत स्वतःचा जीव शर्थीने वाचवला. त्यामुळे मोठा अनर्थ टळल्याची चर्चा घटनास्थळी सुरु होती. या अपघातामुळे तुळसण पूल परिसरात काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

English
हिंदी सारांश
Web Title : Satara: Sugarcane trolley breaks, tractor hits bridge; driver survives!

Web Summary : In Satara, a sugarcane tractor trolley detached, causing the tractor to crash into a bridge barrier. The driver narrowly escaped, avoiding a potential fall into the valley below. Traffic was briefly disrupted. No injuries were reported.