corona virus-कोरोना व्हायरसमुळे वासोटा किल्ल्यावर प्रवेशबंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2020 13:57 IST2020-03-17T13:52:55+5:302020-03-17T13:57:20+5:30
बामणोली वनपरिक्षेत्र अधिकारी बाळकृष्ण हसबनीस यांनी सह्याद्र्री व्याघ्र प्रकल्प हद्दीतील वासोटा किल्ल्यासह पर्यटन व प्रवेश बंदी जाहीर केली आहे. ही बंदी बुधवार, दि. १८ मार्च रोजी पहाटेपासून ते ३१ मार्च २०२० पर्यंत लागू राहील. परिसरातील सर्व बोट क्लबना याचे लेखी निवेदन देण्यात आले आहे. याचा मोठा फटका बोट व्यवसायासह पर्यटनाला बसणार आहे.

corona virus-कोरोना व्हायरसमुळे वासोटा किल्ल्यावर प्रवेशबंदी
बामणोली : बामणोली वनपरिक्षेत्र अधिकारी बाळकृष्ण हसबनीस यांनी सह्याद्र्री व्याघ्र प्रकल्प हद्दीतील वासोटा किल्ल्यासह पर्यटन व प्रवेश बंदी जाहीर केली आहे.
ही बंदी बुधवार, दि. १८ मार्च रोजी पहाटेपासून ते ३१ मार्च २०२० पर्यंत लागू राहील. परिसरातील सर्व बोट क्लबना याचे लेखी निवेदन देण्यात आले आहे. याचा मोठा फटका बोट व्यवसायासह पर्यटनाला बसणार आहे.
राज्यामध्ये कोरोना व्हायरसमुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्याच्या विविध भागात जिल्हास्तरावर मोठ्या प्रमाणावर लोकांचा समूह असतो, अशा ठिकाणी या विषाणूंचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता जास्त असल्याने अतिदक्षतेचा इशारा देण्यात आलेला आहे.
हे लक्षात घेता जिल्हाधिकारी तथा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यांनी ३१ मार्च २०२० पर्यंत विविध क्षेत्रातील पर्यटनस्थळे बंद ठेवण्यासाठी आदेश निर्गमित केले आहेत.
या आदेशान्वये बामणोली वनपरिक्षेत्र अधिकारी बाळकृष्ण हसबनीस यांनी सह्याद्र्री व्याघ्र प्रकल्प हद्दीतील वासोटा किल्ल्यासह पर्यटन व प्रवेश बंदी जाहीर केली आहे.
ही बंदी बुधवार, दि. १८ मार्च रोजी पहाटेपासून ते ३१ मार्च २०२० पर्यंत लागू राहील. परिसरातील सर्व बोट क्लबना याचे लेखी निवेदन देण्यात आले आहे. याचा मोठा फटका बोट व्यवसायासह पर्यटनाला बसणार आहे.