वडूज येथे जम्बो कोविड सेंटर उभारण्याच्या हालचालींना वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:26 IST2021-06-20T04:26:32+5:302021-06-20T04:26:32+5:30

कोरोना बाधितांची ससेहोलपट थांबणार! लोकमत न्यूज नेटवर्क औंध: कोरोनाच्या काळात खटाव-माण तालुक्यातील रुग्णांची होणारी गैरसोय थांबविण्यासाठी व तालुक्यात त्वरित ...

Accelerate the movement to set up a Jumbo Covid Center at Vadodara | वडूज येथे जम्बो कोविड सेंटर उभारण्याच्या हालचालींना वेग

वडूज येथे जम्बो कोविड सेंटर उभारण्याच्या हालचालींना वेग

कोरोना बाधितांची ससेहोलपट थांबणार!

लोकमत न्यूज नेटवर्क

औंध: कोरोनाच्या काळात खटाव-माण तालुक्यातील रुग्णांची होणारी गैरसोय थांबविण्यासाठी व तालुक्यात त्वरित जम्बो कोविड सेंटर होण्यासाठी हरणाई सूतगिरणीचे संस्थापक-अध्यक्ष व काँग्रेसचे नेते रणजितसिंह देशमुख यांनी काँग्रेस पक्षातील मंत्री महोदयांकडे सातत्याने पाठपुरावा केला. जिल्हाधिकारी शेखर सिंह यांना खटाव तालुक्याच्या दौऱ्यावर प्रत्यक्ष वस्तुस्थितीचा आढावा दिला. त्या पाठपुराव्याला यश मिळाले असून, वडूज येथे जम्बो कोविड सेंटर उभारण्याच्या हालचालींना वेग आला आहे. यामुळे रुग्णांना दिलासा मिळाला आहे.

खटाव-माण तालुक्यात कोरोनाच्या लाटेत अनेकांना प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागला आहे. अपुऱ्या सोयी-सुविधांमुळे अनेकांची घरे उद्ध्वस्त झाली आहेत. त्यामुळे रणजितसिंह देशमुख यांनी अत्यंत तळमळीने मंत्रालय स्तरावर अनेक हेलपाटे मारून ''माझ्या जनतेला वाचवा'' अशी आर्त हाक दिली. त्यांना प्रतिसाद देत खास बाब म्हणून खटाव-माणसाठी तातडीने जम्बो कोविड सेंटर करण्याच्या सूचना दिल्या. वडूज येथे प्रशासकीय अधिकाऱ्यांनी जम्बो कोविड सेंटरसाठी जागेची पाहणी केली. लागणाऱ्या सोयी-सुविधांसाठीचे पत्रव्यवहारही सुरू झाले आहेत. १०० बेडचे अद्ययावत कोविड सेंटर येत्या २८ दिवसांत उभे राहण्यासाठी प्रशासकीय पातळीवर हलचाली सुरू झाल्या आहेत. खटाव तालुक्यातील केंद्रबिंदू असणाऱ्या ग्रामीण रुग्णालय, वडूज या ठिकाणी शासनाच्या काही एजन्सींमार्फत कोविड सेंटर उभारले जाईल. त्यामुळे जनतेची ससेहोलपट थांबणार आहे.

कोट : दोन्ही तालुक्यांतील जनतेची होणारी आर्थिक पिळवणूक, ससेहोलपट थांबविण्यासाठी हा एक छोटासा प्रयत्न आहे. खटाव-माणच्या जनतेच्या कोणत्याही प्रश्नांसाठी मी जिवाचे रान करण्यासाठी मागे-पुढे पाहत नाही. सर्वसामान्य दुष्काळी भागातील जनतेला न्याय देण्यासाठी मी कटिबद्ध आहे. जिल्हाधिकारी यांनी वरिष्ठ मंत्री महोदय व जिल्हा प्रशासन तसेच राज्य प्रशासन यांच्याशी संपर्क साधून ग्रामीण रुग्णालय, वडूज याठिकाणी जम्बो कोविड सेंटर उभारण्याचा प्रयत्न केला आहे आणि लवकरच याला यश प्राप्त होईल म्हणून मी तालुक्यातील जनतेच्यावतीने जिल्हा प्रशासनाचे आभार मानतो.

रणजितसिंह देशमुख, काँग्रेस नेते.

फोटो:-रणजितसिंह देशमुख

Web Title: Accelerate the movement to set up a Jumbo Covid Center at Vadodara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.