ताक विकून भागवितोय शैक्षणिक खर्च

By Admin | Updated: November 24, 2015 00:27 IST2015-11-23T23:07:16+5:302015-11-24T00:27:34+5:30

सुटीचा सदुपयोग : डोंगरावरील चिमुकल्याच्या धडपडीला पर्यटकांचाही प्रतिसाद

Academic expenses by selling the opportunities | ताक विकून भागवितोय शैक्षणिक खर्च

ताक विकून भागवितोय शैक्षणिक खर्च

पेट्री : सातारा-बामणोली मार्गावर पेट्रीजवळ आठवीत शिकणारा एक विद्यार्थी दुपारच्या वेळी उन्हात पर्यटकांची तहान भागविण्यासाठी घरून तयार करून आणलेले ताक सध्या दिवाळी सुटीच्या वेळेत विकत आहे. अभ्यासाबरोबरच पुस्तकी ज्ञानाचा वापर व्यवहार ज्ञानात करताना दिसत आहे. यातून मिळालेल्या नफ्याचा वापर शैक्षणिक खर्चासाठी करणार असल्याचे त्याने ठरविले आहे. सातारा शहराच्या पश्चिमेकडील कास, बामणोली जिल्ह्यातील प्रमुख पर्यटनस्थळ म्हणून ओळखली जातात. आंतरराष्ट्रीय जैवविविधता असलेले ठिकाण म्हणून कासची ख्याती जगभरात पसरलेली असल्याने या परिसरात फुलांचा हंगाम असताना देश-विदेशातून पर्यटक पर्यटनासाठी येतात. सध्याच्या दिवाळी हंगामातदेखील मोठ्या संख्येने पर्यटक कास, बामणोलीकडे गर्दी करतात.सकाळ -संध्याकाळ हवेत गारवा असला तरीही दुपारच्या वेळेस उष्णतेची दाहकता भासत आहे. यावेळी सातारा तालुक्यातील अनावळेवाडी येथील पेटेश्वरनगर हायस्कूलमध्ये आठवीत शिकणारा अभिषेक दत्तात्रय शिंदे दिवाळीच्या सुटीत अभ्यासाबरोबरच रोज सकाळी अकरा वाजल्यापासून संध्याकाळी पाचपर्यंत पेट्रीजवळ रस्त्यावर ताक विकण्यासाठी हातात बोर्ड धरून बसतो. यातून पुस्तकी ज्ञानाची सांगड व्यवहारज्ञानाशी घालण्याचा तो रोजच्या रोज प्रयत्न करतो.गेल्या कास पुष्प पठारावरील फुलांच्या हंगामात शाळेला सुटी असतेवेळी पर्यटकांच्या सेवेसाठी भर उन्हात ताक विक्रीस ठेवून चांगला नफा मिळविला होता. दरम्यान, झालेल्या नफ्याचा वापर आपल्या शैक्षणिक साहित्याच्या खचार्साठी करत असल्याचे त्याने सांगितले. (वार्ताहर)


सध्या सुरू असलेल्या दिवाळी हंगामात ताकाचा एक पेला वीस रुपये याप्रमाणे विकला जातो. अनेक पर्यटक मी विद्यार्थी असल्यामुळे ताक घ्यायला थांबतात. मी दिवसभरात किमान चारशे पाचशे रुपये कमवतो. यातून काही पैसे बाजूला ठेऊन उरलेले घरी देतो. या पैशातून मी माझ्या शिक्षणाचा खर्च करतो.
-अभिषेक शिंदे, विद्यार्थी, अनावळेवाडी

Web Title: Academic expenses by selling the opportunities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.