शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
2
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
3
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
4
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
5
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
6
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
7
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
8
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
9
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
10
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
11
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
12
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
13
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
14
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
15
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
16
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
17
फास्टॅग फसवणुकीचा नवा प्रकार! NHAI कडून महत्त्वाची सूचना जारी; एक चूक आणि होईल मोठं नुकसान
18
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
19
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
20
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
Daily Top 2Weekly Top 5

खुनाच्या गुन्ह्यातील फरारीस अटक

By admin | Updated: February 20, 2017 03:08 IST

गोव्यातील म्हापसा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या खुनाच्या गुन्ह्यात तब्बल १८ वर्षे फरार असलेल्या आरोपीला सहकारनगर पोलिसांनी खबऱ्याकडून

पुणे : गोव्यातील म्हापसा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या खुनाच्या गुन्ह्यात तब्बल १८ वर्षे फरार असलेल्या आरोपीला सहकारनगर पोलिसांनी खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे ताब्यात घेतले. त्याला गोवा पोलिसांच्या ताब्यात देण्यात येणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक निकम यांनी दिली. दशरथ चतुरसिंग रजपूत (वय ४०, रा. गुलाबनगर, धनकवडी) असे ताब्यात घेण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत म्हापसा पोलिसांना माहिती कळवण्यात आली असून, त्याला गोवा पोलिसांच्या ताब्यात देण्यात येणार आहे. ही कारवाई वरिष्ठ निरीक्षक दीपक निकम यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक चेतन मोरे यांच्या पथकाने केली.(प्रतिनिधी) पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, म्हापसा पोलीस ठाण्यामध्ये १९९९ सालचा रजपूतविरुद्ध खुनाचा एक गुन्हा दाखल आहे. पोलीस ठाण्याचे कर्मचारी इंगळे व येवले यांना खबऱ्याने रजपूत त्याच्या भावाकडे धनकवडीमध्ये येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार, सापळा लावून त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडे चौकशीमध्ये तो १८ वर्षांपासून फरार असल्याची माहिती त्याने पोलिसांना दिली.