शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

माढ्यात अभयसिंह जगतापांमुळे राष्ट्रवादीपुढे अजून तिढाच, शरद पवारांची घेतली भेट 

By नितीन काळेल | Updated: April 15, 2024 19:12 IST

सकारात्मक चर्चेनंतरही दोन दिवसांत निर्णय घेणार

सातारा : माढा मतदारसंघात राष्ट्रवादीकडून तुतारी वाजविण्याच्या तयारीतील अभयसिंह जगताप यांनी शरद पवार यांची भेट घेतली असलीतरी दोन दिवसांत निर्णय घेऊ असे त्यांनी सांगितले आहे. पण, सध्या ते प्रकाश आंबेडकर आणि राजू शेट्टी यांची भेट घेऊन चाचपणी करणार असल्याचीही माहिती समोर येत आहे. यामुळे माढ्यात राष्ट्रवादीपुढे अजून तिढाच असल्याचे स्पष्ट होत आहे.राष्ट्रवादी काॅंग्रेसमध्ये दुफळी पडल्यानंतर माढा लोकसभा मतदारसंघातही दोन गट पडले. पक्षाचे तीन आमदार सध्या उपमुख्यमंत्री अजित पवार गटात आहेत. तसेच बहुतांशी नेतेमंडळीही अजित पवार यांच्याबरोबर आहेत. त्यामुळे माढ्यात मोजक्याच शिलेदारांवर पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भिस्त आहे. यामध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अभयसिंह जगताप यांचा समावेश आहे. माढा लोकसभेसाठी आपल्यालाच उमेदवारी मिळणार म्हणून ते सहा महिन्यांपासून मतदारसंघात फिरत होते. तसेच संपर्क वाढवत पक्षाला उर्जितावस्था देण्याचा प्रयत्न केला.पण, शरद पवार यांनी धैर्यशील मोहिते-पाटील यांना पक्षात प्रवेश देऊन उमेदवारीही जाहीर केली. त्यामुळे अभयसिंह जगताप नाराज झाले आहेत. त्यांनी निवडणुकीत उतरण्याचा इशाराही दिला. जगताप यांनी बंडखोरी केल्यास राष्ट्रवादीच्या उमेदवारालाच फटका बसणार होता. हे ओळखून वरिष्ठांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला आहे.

सोमवारी सकाळी पुण्यात शरद पवार यांची अभयसिंह जगताप यांनी भेट घेतली. यावेळी माढा मतदारसंघातील उमेदवारीवरून चर्चा झाली. तसेच मतदारसंघातील प्रश्न, ते सोडविण्यासाठी मला उमेदवारी मिळायला हवी, असे जगताप यांनी सांगितले. यावर पवार यांनी मी तुमच्याबरोबर आहे. कल्पना मांडा. लोकसभा निवडणुकीनंतर आपण भेटू, असे पवार यांनी जगताप यांना आश्वस्त केल्याची माहिती मिळत आहे. तरीही जगताप हे वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांचीही भेट घेणार असल्याची नवीन माहिती समोर आलेली आहे. त्यामुळे जगताप हे काय निर्णय घेणार यावरच माढ्यातील राष्ट्रवादीचा तिढा सुटणार की वाढणार हे स्पष्ट होणार आहे.

पुण्यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबरोबर भेट झाली आहे. या भेटीत विविध विषयांवर चर्चा झाली. सर्व बाबतीत सकारात्मक चर्चा झाली आहे. तरीही माढा मतदारसंघातील कार्यकर्त्यांची बैठक घेऊन पुढील भूमिका जाहीर करणार आहे. यासाठी दोन दिवसांचा तरी वेळ लागणार आहे. - अभयसिंह जगताप, प्रदेश सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस

टॅग्स :Satara areaसातारा परिसरsatara-pcसाताराmadha-pcमाढाlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४Sharad Pawarशरद पवार