अबब... चार दिवसांत ४० हजार पर्यटक !
By Admin | Updated: October 26, 2014 23:25 IST2014-10-26T21:31:54+5:302014-10-26T23:25:43+5:30
वाहनांच्या ताफा : महाबळेश्वरमध्ये दिवाळी सुटीसाठी राज्याबाहेरून हौसी पर्यटक दाखल

अबब... चार दिवसांत ४० हजार पर्यटक !
महाबळेश्वर : महाबळेश्वरमध्ये दिवाळी हंगाम तेजीत असून, दिवाळीसाठी आलेल्या सलग सुटीमुळे महाराष्ट्राबरोबरच विविध राज्यांतील हौसी पर्यटकांना महाबळेश्वरचा निसर्ग खुणवू लागला आहे. चार दिवसांत तब्बल ४० हजार पर्यटकांनी भेट दिली आहे. त्यामुळे शहरातील रस्त्यावर वाहनांच्या ताफा लागला आहे.
विधानसभा निवडणुकीनंतर महाबळेश्वर शहरात दररोज गुजरात राज्यातून तसेच इतर भागातून गाड्या तसेच खासगी वाहनांतून पर्यटक दाखल होऊ लागले आहेत. पर्यटकांना महाबळेश्वर फिरण्यासाठी स्थानिक टॅक्सीचालकांचे पर्यटकांमागे धावपळ सुरू झाली आहे. आॅर्थरसीट पॉइंट, मुंबई (सनसेट) पॉइंट, इतर महत्त्वाच्या पॉइंटच्या ठिकाणी पॉइंट पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी होत आहे.
वेण्णा लेक परिसरात सायंकाळी पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. बाहेरून येणारे पर्यटक आणि स्थानिक टॅक्सीवाले यांच्या वाहने उभी करण्यासाठी वाहनतळावर जागाच शिल्लक नाही.
त्यामुळे वेण्णा लेकजवळही वाहनांची मोठी कोंडी होत आहे. याचा स्थानिक स्टॉलधारक व व्यावसायिकांवर परिणाम होत आहे. शहरातील सुभाष चौक, शिवाजी चौकांत वाहनांची कोंडी होत आहे.
व्यापारी, हॉटेल व्यावसायिक, टॅक्सीचालक, धाबेवाले, फिरते विक्रेते, स्ट्रॉबेरी, कणिस विक्रेते, घोडेस्वार यांची दिवाळी चांगली झाली आहे. (प्रतिनिधी)