अपहरण करून वृद्धाला मारहाण

By Admin | Updated: November 2, 2016 00:27 IST2016-11-02T00:27:17+5:302016-11-02T00:27:17+5:30

दोघांवर गुन्हा

Abduction of the old man by hijacking | अपहरण करून वृद्धाला मारहाण

अपहरण करून वृद्धाला मारहाण

कऱ्हाड : कऱ्हाड तालुक्यातील कोळे येथील वृद्धाचे अपहरण करून मारहाण करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी कऱ्हाड तालुका पोलिसांत दोघांवर गुन्हा नोंद करण्यात आला असून, एकास अटक करण्यात आली आहे.
नीलेश निवृत्ती फिरंगे (रा. कोळे) यांनी याबाबतची फिर्याद दिली आहे. फिर्यादीवरून प्रवीण खाशाबा जाधव (वय ३२, रा. विंग, ता. कऱ्हाड) याच्यासह अन्य एकावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोळे येथील निवृत्ती फिरंगे यांचा विंगमधील एकाशी पैशाच्या देवाणघेवाणीचा व्यवहार होता. या कारणावरून शनिवारी रात्री दहाच्या सुमारास प्रवीण जाधव याच्यासह अन्य एकाने निवृत्ती फिरंगे यांचे अपहरण केले. त्यानंतर त्यांना बेदम मारहाण ही केली. याबाबत निवृत्ती फिरंगे यांचा मुलगा नीलेश याने कऱ्हाड तालुका पोलिसांत फिर्याद दिली असून, प्रवीण जाधव याला अटक करण्यात आली आहे. सहायक पोलिस निरीक्षक दीपिका जौंजाळ तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)
 

Web Title: Abduction of the old man by hijacking