शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

Satara: मद्यधुंद कारचालकाने दुचाकीस्वारास चिरडले, एक ठार, एकजण गंभीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2024 16:14 IST

टायर फुटल्याने कार थांबली

कऱ्हाड : कऱ्हाड-पाटण मार्गावर शनिवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास सुसाट कारने दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील एक युवक जागीच ठार झाला. तर अन्य एक युवक गंभीर जखमी झाला आहे. आबईचीवाडी, ता. कऱ्हाड गावच्या हद्दीत हा अपघात झाला.दरम्यान, अपघातानंतर जागेवरच न थांबता मद्यधुंद चालकाने कार सुसाट पुढे नेली. त्यानंतर सुमारे एक किलोमीटर अंतरावर सुपने बसथांब्यावर ग्रामस्थांनी कार अडवून चालकाला चोप दिला. या घटनेनंतर परिसरात तणाव निर्माण झाला होता. अपघातप्रकरणी कारचालकावर कऱ्हाड ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.केदार अशोक संकपाळ (वय १८, रा. म्होप्रे), असे अपघातात ठार झालेल्या युवकाचे नाव आहे. तर गंभीर जखमी झालेल्या वीरेंद्र नरेंद्र माने (१९, रा. म्होप्रे, ता. कऱ्हाड) याच्यावर खासगी रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. दीपक वसंत पवार (३९, रा. बैलबाजार रोड, शनिवार पेठ, कऱ्हाड), असे गुन्हा दाखल झालेल्या कारचालकाचे नाव आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, म्होप्रे येथील केदार संकपाळ हा शनिवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास मित्र वीरेंद्र माने याच्यासोबत दुचाकीवरून (एमएच ११ एई ३६५९) कऱ्हाडकडे येत होता. ते दोघेही आबईचीवाडी गावच्या हद्दीत आले असताना पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या कारने (एमएच ५० यू ५७५६) दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिली. ही धडक एवढी भीषण होती की, केदार व वीरेंद्र हे दोघेजण रस्त्यावरून दूरवर फेकले गेले. त्यामध्ये केदारचा जागीच मृत्यू झाला. तर वीरेंद्र गंभीर जखमी झाला.अपघातानंतर चालकाने कार न थांबविता तो सुसाट निघून गेला. सुमारे एक किलोमीटर अंतरावर सुपने गावच्या हद्दीत बसथांब्यावर ग्रामस्थांनी ती कार अडवली. त्यानंतर अपघाताची माहिती कऱ्हाड ग्रामीण पोलिस ठाण्यात दिली. घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवून दिला. तर जखमीवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघाताची नोंद कऱ्हाड ग्रामीण पोलिस ठाण्यात झाली आहे.

टायर फुटल्याने कार थांबलीअपघातग्रस्त कार सुसाट वेगात होती. आबईचीवाडीच्या हद्दीत दुचाकीला कारने धडक दिली. त्यावेळी दुचाकीचे कॅरेज तुटून ते कारच्या डाव्या बाजूच्या पुढच्या चाकात अडकले. हे कॅरेज टायरला घासल्यामुळे सुपने गावच्या हद्दीत कारचा टायर फुटला. त्यामुळे कार थांबली. आणि ग्रामस्थांनी कारला घेराव घातला, अशी घटनास्थळी चर्चा होती.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरAccidentअपघातDeathमृत्यू