फलटण - फलटण तहसिल कार्यालय येथे ७९ व्या स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमा नंतर प्रहार शेतकरी व दिव्यांग संघटनेच्या आंदोलकांशी फलटण कोरेगावचे आमदार चर्चा करत होते. यावेळी राजाळे येथील निखिल निंबाळकर या युवकाने अंगावर बाटलीतून आणलेले पेट्रोल ओतून घेऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. प्रहार संघटनेतील एका जागरूक शेतकऱ्यानी निखिल यास थांबवत हातातील बाटली हिसकावून घेतली. निखिल याने अंगावर पेट्रोल ओतून घेतले होते यावेळी शेतकऱ्यांनी त्यास रोखले व पोलिसांच्या ताब्यात दिले.
निखिल निंबाळकर या युवकाने अनेक महिन्यापासून राजाळे येथील जानाई मंदिर ते सरडे अतिक्रमित रस्त्याच्या प्रश्नासाठी तहसिल कार्यालय फलटण तसेच जिल्हाधिकारी कार्यालय सातारा येथे निवेदने दिली असून यावर कोणतीही कार्यवाही झाली नाही व न्याय मिळत नसल्याने आपण आत्मदहन करण्याचा प्रयत्न केल्याचे निखिल निंबाळकर या युवकाने लोकमतशी बोलताना सांगितले.
दिव्यांग बांधवांचे प्रश्न समजून घेत असतानाच प्रांताधिकारी प्रियंका आंबेकर ,तहसिलदार डॉ अभिजित जाधव नायब तहसीलदार अभिजित सोनवणे व इतर सर्व आधिकर्यांच्या उपस्थितीत हा प्रयत्न झाल्याने उपस्थित नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले.
तो सापडलाच नाही ...त्याने स्वातंत्र्य दिना दिवशी आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता फलटण ग्रामिण पोलिस गेली दोन दिवस त्याला शोधत होते मात्र तो त्यांना सापडलाच नाही तो थेट कार्यक्रमा नंतर आंदोलकाशी आधिकरी बोलत होते त्या ठिकाणी येऊन हा प्रयत्न केला.