शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

शर्यतीत बैलगाडीचे चाक अंगावरून गेल्याने युवकाचा मृत्यू, साताऱ्यातील नागठाणे येथील घटना 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2023 17:34 IST

नागठाणे : नागठाणे, ता. सातारा येथे आयोजित बैलगाडा शर्यतीत गाडीची धडक बसून गाडीचे चाक अंगावरून गेल्यामुळे एका तरुणाचा मृत्यू ...

नागठाणे : नागठाणे, ता. सातारा येथे आयोजित बैलगाडा शर्यतीत गाडीची धडक बसून गाडीचे चाक अंगावरून गेल्यामुळे एका तरुणाचा मृत्यू झाला. हा अपघात बुधवारी सायंकाळच्या सुमारास झाला. बिरेंदर सिंग (वय ३२, सध्या रा. बोरगाव, ता. सातारा मूळ रा. पंजाब) असे त्याचे नाव आहे.याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, बुधवारी सकाळी ११ वाजता नागठाणे येथील यात्रेच्या माळावर जय हनुमान तालीम संघ नागठाणे यांच्या वतीने बैलगाडा शर्यत आयोजित करण्यात आली होती. यामध्ये जवळपास २५० गाड्या सहभागी झाल्या होत्या. प्रेक्षकांचीही संख्या लक्षणीय होती. सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास बिरेंदर सिंग हा तरुण उपांत्य फेरीच्या शर्यतीदरम्यान सीमारेषेजवळ उभा होता.यावेळी अतिवेगाने आलेल्या बैलगाडीची सिंग यांच्या तोंडास जोराची धडक बसली, ही धडक इतकी भीषण होती की, सिंग हा त्याच ठिकाणी कोसळला. त्याचवेळी गाडीचे छकड्याचे चाक त्याच्या तोंडावरून गेल्यामुळे सिंग याचा जबडा फाटला. घटनेचे गांभीर्य ओळखून आयोजकांनी रुग्णवाहिकेतून सिंग यास नागठाणे प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले; परंतु उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.घटनेची माहिती मिळताच बोरगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि नागठाणे सासपडे रस्त्याची विस्कळीत झालेली वाहतूक सुरळीत करून दिली. रात्री उशिरापर्यंत बोरगाव पोलिस ठाण्यात घटनेची नोंद करण्याचे काम चालू होते. अधिक तपास बिट अंमलदार हवालदार हणमंत सावंत करीत आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरBull Cart Raceबैलगाडी शर्यतDeathमृत्यू