शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Satara: खड्ड्यात दुचाकी आदळून तरुणी ठार, दोघे जखमी; बहिणींना शाळेला सोडायला जाताना झाला अपघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2025 18:46 IST

लोणंद : आळंदी - पंढरपूर पालखी मार्गावर निरा मार्गावर पाडेगावजवळ खड्ड्यात गाडी आदळून झालेल्या अपघातात बारावीतील तरुणी ठार झाली ...

लोणंद : आळंदी - पंढरपूर पालखी मार्गावर निरा मार्गावर पाडेगावजवळ खड्ड्यात गाडी आदळून झालेल्या अपघातात बारावीतील तरुणी ठार झाली असून, दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. हा अपघात सोमवार, दि. ६ रोजी सकाळी सातच्या सुमारास झाला. अंकिता अनिल धायगुडे असे अपघातात ठार झालेल्या तरुणीचे नाव आहे. विशाल धायगुडे, सानिका धायगुडे अशी जखमींची नावे आहेत.बाळूपाटलाचीवाडी, ता. खंडाळा येथील विशाल दौलत धायगुडे (वय २५), बारावीत शिकणारी अंकिता अनिल धायगुडे (१७) व दहावीत शिकणारी सानिका विलास धायगुडे (१५) हे तिघे दुचाकी (एमएच ११ बीएफ ०६८३) वरून बाळूपाटलाचीवाडी येथून निरेकडे निघाले होते. विशाल धायगुडे हा जेजुरी येथे औद्योगिक वसाहतीत कामाला असल्याने दोन्ही चुलत बहिणींना शाळेसाठी निरेमध्ये सोडून तो पुढे जेजुरीला जाणार होता.निरा मार्गावरील एका पेट्रोल पंपासमोर ते आले असता तेथे तेथे असलेल्या खड्ड्यात पाणी साठल्याने अंदाज आला नाही. या खड्ड्यात गाडी आदळल्याने दुचाकी या खड्ड्यात जोरदार आदळली. यामुळे तिघेही रस्त्यावर पडले. यामध्ये निरा येथील किलाचंद ज्युनिअर कॉलेजमध्ये बारावी विज्ञान शाखेत शिकणारी अंकिता धायगुडे हिचा जागीच मृत्यू झाला, तर विशाल धायगुडे, सानिका धायगुडे हे गंभीर जखमी झाले. विशाल धायगुडे यांना पुढील उपचारासाठी पुणे येथे हलविण्यात आले. सानिका धायगुडे हिच्यावर लोणंद येथील खासगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत.

ग्रामस्थांचा रास्ता रोकोसंबंधित ठेकेदारावर गुन्हा दाखल करा, यासाठी पालखी महामार्ग बाळूपाटलाचीवाडी येथील ग्रामस्थांनी रोखून धरला. यामुळे एक तास संपूर्ण वाहतूक ठप्प झाली होती. राजमाता अहिल्यादेवी चौकातच शेकडो नागरिक रस्त्यावर बसल्याने पुणे, सातारा व फलटणकडे जाणाऱ्या तिन्ही रस्त्यांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरAccidentअपघातDeathमृत्यू