शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

Satara: जन्मत:च 'तिच्या' हृदयाला छिद्र, वडिलांनी सहलीला जाऊ नको म्हणून सांगितलं, तरी हट्ट करून गेली, अन्..

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2025 12:39 IST

हृदयाने कमजोर असतानाही गडावर पोहोचल्याचा आनंद झाला. तिने वडिलांना मोबाईलवर फोन केला

सातारा : जन्मत:च तिच्या हृदयाला छिद्र. असे असतानाही ‘ती’ वर्गातील मैत्रिणींसोबत सहलीला सज्जनगडावर आली. सज्जनगडाच्या वाहनतळापासून तिने गड चढला. पूर्ण गड चढून ती सज्जनगडावर पोहोचली. तिला इतका आनंद झाला की तिने तत्काळ तिच्या वडिलांना फोन केला, ‘पप्पा, मी गड चढला.’ असं म्हणताच ती खाली कोसळली. तिला रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र, उपचारांदरम्यान तिची प्राणज्योत मावळली. ही हृदयद्रावक घटना रविवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास सज्जनगडावर घडली.श्रावणी राहुल लिंमकर (वय १६, रा. करमाळा रोड, करमाळा, सोलापूर) असे मृत्यू झालेल्या दुर्दैवी मुलीचे नाव आहे. श्रावणी ही दहावीत शिक्षण घेत होती. करमाळ्यात तिने एक खासगी क्लास लावला होता. या क्लासमधील मुला-मुलींची सहल रविवारी सज्जनगडावर आली होती. सहलीला येण्यापूर्वी तिच्या वडिलांनी तिला ‘तू जाऊ नकोस’, असं सांगितलं होतं. कारण तिच्या हृदयात लहानपणापासून छिद्र होतं. यामुळे तिला डाॅक्टरांनी खबरदारी घेण्याचे सांगितले होते. तिच्यावर उपचारही सुरू होते. असे असतानाही हट्ट करून ती सहलीला सज्जनगडावर आली. सज्जनगडावरील वाहनतळावर सर्वजण वाहनातून उरतल्यानंतर हळूहळू चालत पायऱ्यांवरून सर्व मुले सज्जनगडावर निघाले. यात श्रावणीही चालत निघाली होती. पायऱ्या चढून गडावर पोहोचल्यानंतर तिला थोडी धाप लागली होती. परंतु, यापेक्षा तिला आपण हृदयाने कमजोर असतानाही गडावर पोहोचल्याचा आनंद झाला. तिने तिच्या वडिलांना मोबाईलवर फोन केला, ‘पप्पा बघा, तुम्ही म्हणत होता जाऊ नकाेस, पण मी गड चढला’, असं म्हणताच ती खाली कोसळली.तिच्या शेजारी असलेल्या इतर मुलींनी तिला तातडीने आधार दिला. तिची शुद्ध हरपली होती. पायऱ्या उतरून तिला कसेबसे वाहनतळापर्यंत आणण्यात आले. यानंतर तातडीने तिला साताऱ्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारांदरम्यान तिचा मृत्यू झाला.

मैत्रिणी धायमोकलून रडल्या..श्रावणी ही मितभाषी व अभ्यासात हुशार होती. तिच्या अचानक झालेल्या मृत्यूमुळे तिच्यासोबत असलेल्या वर्ग मैत्रिणींना मोठा मानसिक धक्का बसला. ‘ती’ या जगात नाही, हे समजताच तिच्या मैत्रिणी धायमोकलून रडू लागल्या. ‘तिनं तिच्या पप्पांचं ऐकलं पाहिजं होतं’, असं म्हणत मैत्रिणी रडत होत्या.