शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

Satara Crime: ..अन् डोक्यात दगड घालून केला तरुणाचा खून, १२ तासांत गुन्हा उघड; दोघे ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2023 17:17 IST

स्थानिक गुन्हे शाखेने दोघा आरोपींनी ताब्यात घेतले

सातारा : जुन्या भांडणाच्या कारणातून डोक्यात दगड घालून तरुणाचा खून करण्यात आला. हा प्रकार मेढा येथे घडला. याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने दोघा आरोपींनी ताब्यात घेतले आहे. तर मृत तरुणाचे नाव राम बाबू पवार (वय ३६, रा. गांधीनगर, मेढा) असे आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शुक्रवारी सकाळच्या सुमारास मेढा येथील एका दुकानाच्या समोरील खड्ड्यात राम पवार याचा अज्ञात व्यक्तीने डोक्यात दगड आणि लाकडी फळीने मारहाण करून खून केल्याचे निदर्शनास आले होते. त्यानंतर मेढा पोलिस ठाण्यात नोंद झाला होता.या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस अधीक्षक समीर शेख आणि अतिरिक्त पोलिस अधीक्षक बापू बांगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अरुण देवकर यांना गुन्हा उघडकीस आणण्याची सूचना केली होती. त्यामुळे सहायक पोलिस निरीक्षक संतोष पवार, रवींद्र भोरे, उपनिरीक्षक अमित पाटील, विश्वास शिंगाडे यांच्यासह एक पथक घटनास्थळी गेले. संशयितांची माहिती घेत असताना पोलिस निरीक्षक अरुण देवकर यांना मेढा येथीलच दोघांनी राम पवार याचा खून केला असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे यांच्या पथकाने मेढा शहरात शोध घेऊन दोघांना ताब्यात घेतले. अक्षय सोमनाथ साखरे (वय २२) आणि परमेश्वर गणपत पवार (२६, दोघेही रा. मेढा) अशी त्यांची नावे असल्याचे समोर आले. दोघांनाही अटक करण्यात आली आहे. दरम्यान, याप्रकरणी मेढा पोलिस पुढील तपास करीत आहेत.१२ तासांत गुन्हा उघड...मेढा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर १२ तासांच्या आत तो उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले. तर मृत राम पवार हा संशयितापैकी एकाच्या वडिलांना जुन्या भांडणाच्या कारणावरून त्रास देत होता. त्यामुळे त्याच्या डोक्यात दगड घालण्यात आला. यामध्येच राम पवार याचा मृत्यू झाला, असे पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस