शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

Satara Crime: अल्पवयीन मुलीवर अत्याचार; तरुणाला वीस वर्षे शिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2026 17:04 IST

१९ हजार रुपये दंड व दंड न भरल्यास दोन महिने साधा कारावास

शिरवळ : एका पंधरा वर्षीय मुलीला फूस लावून पळवून नेऊन तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केल्याप्रकरणी किरण राजाराम वसेकर (वय २०) याला वाई येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर. एन. मेहरे यांनी दोषी धरत २० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. तसेच १९ हजार रुपये दंड व दंड न भरल्यास दोन महिने साधा कारावास, असाही न्यायालयाने आदेश दिला.या खटल्याची पार्श्वभूमी अशी, संबंधित १५ वर्षीय मुलीबरोबर किरण वसेकर याने ओळख निर्माण केली. त्यानंतर विविध ठिकाणी तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केला. तिला फूस लावून धाराशिव येथे नेऊन तेथेही त्याने तिच्यावर अत्याचार केला. हा प्रकार २८ जानेवारी २०२१ ते २ फेब्रुवारी २०२१ या कालावधीत घडला. मुलीच्या मावशीने शिरवळ पोलिस ठाण्यात किरण वसेकर याच्याविरुद्ध अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायदा व बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. यानंतर पोलिसांनी वसेकर याला अटक केली. फलटणचे तत्कालीन उपविभागीय अधिकारी तानाजी बरडे यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. सुनावणीदरम्यान एकूण ९ साक्षीदार तपासण्यात आले. न्यायालयापुढे आलेले पुरावे आणि साक्षीदार ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपी किरण वसेकर याला वीस वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. सरकारी वकील महेश यू. शिंदे यांनी सरकार पक्षातर्फे काम पाहिले.पोलिस निरीक्षक यशवंत नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस उपनिरीक्षक नाना धायगुडे, अंमलदार सचिन भोसले, सचिन वीर, अंमलदार सुधाकर सपकाळ, न्यायालयीन प्राॅसिक्युशन स्काॅडचे सहायक पोलिस उपनिरीक्षक शिवाजीराव पांब्रे, अविनाश डेरे, अंमलदार कीर्तीकुमार कदम, भुजंगराव काळे, हेमा कदम, प्रीतम नाळे यांनी सरकार पक्षाला सहकार्य केले.

English
हिंदी सारांश
Web Title : Satara Crime: Minor Girl Assaulted; Youth Sentenced to Twenty Years

Web Summary : A 20-year-old man, Kiran Vasekar, received a 20-year prison sentence for raping a 15-year-old girl in Shirwal. He was also fined ₹19,000 for the 2021 crime, which involved abduction and repeated abuse.