शहरं
Join us  
Trending Stories
1
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
2
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
3
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
4
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
5
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
6
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
7
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
8
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
9
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
10
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
11
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
12
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
13
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
14
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
15
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
16
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
17
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
18
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
19
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
20
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय

Satara: पाच मिनिटांत येतो म्हणाला अन् अपघातात जीव गमावला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2024 11:57 IST

नेमका अपघात कसा झाला, की त्याला अज्ञात वाहनाने धडक दिली, हे अद्याप समोर आले नाही.

सातारा: येथील लक्ष्मी टेकडीतील नातेवाइकांकडे आलेल्या आदिनाथ प्रकाश भोरे (वय २७, सध्या रा. लक्ष्मी टेकडी, सदर बझार, सातारा. मूळ रा. शेटफळे, ता. आटपाडी, जि. सांगली) या तरुणाच्या दुचाकीला बाॅम्बे रेस्टाॅरंट परिसरात अपघात झाला. यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला असून, हा अपघात रविवारी सायंकाळी पाच वाजता झाला.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, आदिनाथ भोरे याची आत्या लक्ष्मी टेकडी परिसरात वास्तव्यास आहे. काही महिन्यांपूर्वी आदिनाथ हा आत्याकडे राहण्यासाठी आला होता. तो खासगी वाहनावर चालक म्हणून काम करत होता. रविवार, दि. १४ रोजी सायंकाळी पाच वाजता तो ॲक्टिव्हा गाडी घेऊन पाच मिनिटात येतो, असे सांगून घरातून निघून गेला. बाॅम्बे रेस्टाॅरंट परिसरातील सर्व्हिस रस्त्यावर त्याच्या दुचाकीचा अपघात झाला. यामध्ये त्याच्या डोक्याला गंभीर जखम झाली. रुग्णवाहिकेने त्याला तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, आदिनाथच्या दुचाकीचा नेमका कसा अपघात झाला, की त्याला अज्ञात वाहनाने धडक दिली, हे अद्याप समोर आले नाही. या अपघाताची सातारा शहर पोलिस ठाण्यात नोंद झाली असून, हवालदार मेचकर हे अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरAccidentअपघातDeathमृत्यू