शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
2
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश
3
ट्रम्प टॅरिफचा परिणाम, सोन्या-चांदीचे दर उच्चांकी स्तरावर; खरेदीसाठी आणखी खिसा रिकामा करावा लागणार
4
आधी फिल्मी स्टाईलने माहिती घेतली, कारवाई केली, आता त्याच कंपनीने शिंदेंच्या मंत्र्यांच्या कार्यक्रमाला स्पॉन्सर केले
5
इस्रायल, ब्रिटनपासून युक्रेनपर्यंत...; 'ही' धोकादायक मिसाईल खरेदी करण्यासाठी १९ देशांची धडपड!
6
रक्षाबंधन असणार खास! ६५ वर्षांपूर्वी जत्रेत हरवलेली बहीण सापडली, नातवाने भावाशी भेट घडवली
7
'अमेरिका दबाव टाकू शकत नाही; भारतानेही त्यांच्यावर ५०% कर लादावा', शशी थरुर थेट बोलले
8
मुंबई-गोवा ‘वंदे भारत’ २० कोचची होणार? कधीपासून सेवा सुरू करणार? प्रवाशांचा तुफान प्रतिसाद
9
ट्रम्पचा 'टॅरिफ बॉम्ब' थांबता थांबेना! आता थेट चिप्सवर १००% शुल्क, तुमच्या खिशाला किती फटका बसेल?
10
Shravan Purnima 2025: श्रावण पौर्णिमेला कोळीबांधव का करतात रामाची पूजा? जाणून घ्या कारण!
11
मॉर्फ कमी होते म्हणून की काय Elon Musk आता खालच्या पातळीवर उतरले; ग्रोक एआय देणार आता नग्न फोटो 
12
मुलीची पाठवणी करताना वधूपिता गहिवरला, डबडबल्या डोळ्यांनी जावईबापूंना म्हणाला- माझी लेक... (VIDEO)
13
"१२ फ्लॅट, ४ बंगले.., शिंदेंच्या आमदारांची मस्ती जिरवायचीय"; भाजपा आमदाराचा गंभीर आरोप
14
कोरोना काळात एका गोळीसाठी अमेरिका तडफडत होता, भारताने एका कॉलवर ५० लाख टॅब्लेट पाठवल्या आणि आता...
15
५०० रुपयांच्या SIP चा हप्ता चुकला अन् बँकने लावला ५९० रुपये दंड, तुही तर ही चूक करत नाही ना?
16
“अमेरिकेच्या आदेशांचे पालन करतोय, तोपर्यंत भारत महान मित्र, पण...”; चीनने स्पष्टच सांगितले
17
पीडितेच्या साडीने माजी खासदाराला पाठवले तुरुंगात, प्रज्वल रेवण्णा प्रकरणात कसा सापडला महत्त्वाचा पुरावा?
18
या देशामध्ये मुस्लिमांना सार्वजनिक ठिकाणी सण साजरे करण्यास करण्यात आली मनाई  
19
"मी खेळू शकेन असं वाटत नाही, पण CSK साठी..."; धोनीच्या विधानाने चाहत्यांच्या भुवया उंचावल्या
20
Aashna Chaudhary : जिद्दीला सॅल्यूट! अपयशाने खचली नाही, IPS होण्याचं स्वप्न केलं पूर्ण, आता मिळाली मोठी जबाबदारी

पसरणी येथे ऊसाने भरलेला ट्रक कालव्यात पलटी, चालकाने ट्रकमधून उडी घेतल्याने अनर्थ टळला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2022 16:38 IST

स्थानिक तरुणांच्या मदतीने ट्रकला दोरखंड बांधून ट्रक पलटी होण्यापासून वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र अखेर ट्रक कालव्यात पलटी झाला.

वाई : पसरणी येथील भैरवनाथनगर येथील कालव्यात ऊसाने भरलेला ट्रक (केए २५ ऐ २१६४) पलटी झाला. ट्रकचालकाने प्रसंगावधान दाखवत वेळीच ट्रकमधून उडी घेतल्याने अनर्थ टळला. हा अपघात शुक्रवारी सायंकाळी सहाच्या सुमारास झाला.ट्रक कालव्यात पलटी झाल्याने पाणी तुंबून लाखो लिटर पाणी वाया गेले. ही मािहती समजल्यावर धोम पाटबंधारे विभागाने तातडीने पाणीपुरवठा बंद केला.य‍ाबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, पसरणी येथील भैरवनाथ नगर नावाच्या शिवारामध्ये बबन शिर्के यांच्या शेतात ऊसतोड सुरू होती. बीड येथील ऊसतोड कामगारांनी सायंकाळी सहाच्या सुमारास उसाने भरलेला ट्रक शिवारातून बाहेर काढला. ट्रक चालक विठ्ठल राठोड व अन्य दोघेजण ट्रकमधून कऱ्हाड येथील रयत कारखान्याकडे निघाला होता.धोम डाव्या कालव्याच्या शेजारील रस्त्याने ऊसाने भरलेला ट्रक घेऊन जाताना मागील चाक जमिनीमध्ये रुतल्याने ट्रक एका बाजूला कलू लागला. गांभीर्य लक्षात आल्याने त्याने त्वरित खाली उतरून स्थानिक तरुणांच्या मदतीने ट्रकला दोरखंड बांधून ट्रक पलटी होण्यापासून वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र अखेर ट्रक कालव्यात पलटी झाला. यावेळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. अनेकांनी हा प्रसंग मोबाईलमध्ये कैद केला.ऊसाने भरलेल्या संपूर्ण ट्रक कॅनॉलमध्ये पलटी झाल्याने कॅनॉलचे पाणी तुंबले व शेजारील कुंड्यांमध्ये वाहू लागले. त्यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेले. मात्र कोणत्याही प्रकारचे नुकसान झाले नाही. सायंकाळी दहाच्या सुमारास क्रेनच्या सहाय्याने ट्रक कालव्यातून बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु होते. अथक प्रयत्नानंतर ट्रक बाहेर काढण्यात आला.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरAccidentअपघातSugar factoryसाखर कारखाने