शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंना भाजपाचा मोठा धक्का; २ मोठ्या नेत्यांचा लवकरच पक्षप्रवेश होणार
2
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
3
हत्येनंतर शीर अन् धड वेगळे केले, सुटकेसमध्ये मृतदेह लपवून फरार; अखेर १६ वर्षांनी आरोपीला अटक
4
महाराष्ट्राच्या १५ हजार एकर महसूल जमिनीसह सीमेवरील १४ गावांवर तेलंगण राज्याचा ताबा !
5
भारताकडे 'रेअर अर्थ'चा ५वा सर्वात मोठा खजिना; तरीही आयातीसाठी चीनवर का अवलंबून? 'ही' आहे खरी अडचण
6
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
7
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
8
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
9
"मला पुढच्या जन्मी गोविंदा पती म्हणून नकोय...", सुनीता अहुजाचं वक्तव्य चर्चेत, म्हणाली- "हा एकच जन्म..."
10
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
11
ट्रॉलरसह आठ मच्छीमारांचे पाकिस्तानकडून अपहरण?
12
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
13
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
14
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
15
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
16
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
17
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
18
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
19
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
20
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!

Gram Panchayat Elections: कराड तालुक्यातील 'दुशेरे'त कोण ठरणार 'शेर'!, चुलत भावांत सरपंच पदासाठी चढाओढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2022 12:10 IST

दुशेरे ग्रामपंचायतीवर अनेक वर्षांपासून अपवाद वगळता धोंडिराम जाधव यांचीच सत्ता राहिली आहे.

प्रमोद सुकरेकराड : कराड शहरानजीकचे गाव म्हणजे दुशेरे. येथील ग्रामपंचायत निवडणुक १८ डिसेंबर रोजी होत आहे. यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान संचालक धोंडीराम जाधव यांच्या पँनेलला रोखण्यासाठी रोखण्यासाठी विरोधकांनी आघाडी केली आहे. पण निकालात कोण 'शेर' ठरणार याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत. दुशेरे ग्रामपंचायतीवर अनेक वर्षांपासून अपवाद वगळता धोंडिराम जाधव यांचीच सत्ता राहिली आहे. प्रत्येक ग्रामपंचायत निवडणुकीत जाधव यांना विरोधक एकत्र येवून घेरतात. मात्र त्यांना पुरेसे यश प्राप्त करता  आलेले दिसत नाही. यावेळच्या निवडणुकीतही जाधव यांच्या विरोधकांनी कोंडी करत ताकद लावली आहे. माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण,रयत कारखान्याचे अध्यक्ष अँड. उदयसिंह पाटील - उंडाळकर, कृष्णा कारखान्याचे माजी अध्यक्ष अविनाश मोहिते यांच्या गटांनी एकत्र येत महाआघाडी करुन पँनेल ठाकले आहे.निवडणूकीत ९ जागांसाठी १८ उमेदवार रिंगणात आहेत. सरपंच पद खुल्या गटासाठी नव्हे यर ओबीसी पुरुष जागेसाठी आरक्षित आहे. तरी देखील निवडणूक अटीतटीची बनली आहे. निवडणुकीत दोन्ही गटांचा कस लागला आहे.पण निवडणूक निकालात कोण 'शेर' ठरणार हे पहाण्यासाठी थोडे थांबावेच लागेल.सत्ताधारी भरतदास महाराज पॅनेलचे नेतृत्व कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान संचालक धोंडीराम जाधव हे करीत आहेत. त्यांना माजी संचालक माणिकराव जाधव यांच्यासह समर्थकांचे चांगले पाठबळ आहे. तर विरोधी बाळसिद्ध पॅनेलचे नेतृत्व कोयना दूध संघाचे संचालक शिवाजीराव जाधव, पांडुरंग जाधव, राजेंद्र जाधव, उत्तमराव पाटील आदी प्रमुख कार्यकर्ते करीत आहेत.

सोसायटीत केले सत्तांतरगत वर्षभरापूर्वी गावातील विकास सेवा सोसायटीची निवडणूक पार पडली होती.खरंतर यात सत्तांतर ही बाब खूपच कठीण तरीही  यात धोंडीराम जाधव यांच्याकडे असणारी १० वर्षाची सत्ता याच विरोधी आघाडीने खेचून घेतली आहे.

आरोप प्रत्यारोपांच्या फैरीमतदानाची तारीख काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे प्रचारालाच चांगला जोर चढला आहे. पदयात्रा, प्रचारसभा आणि त्यात आरोप प्रत्यारोपांच्या होणाऱ्या फैरी यावेळी ग्रामस्थांचे मनोरंजन करीत आहेत. आता यातून मतदार नेमकं काय घेणार? आणि मतदान नेमके कोणाला करणार ?हे त्यांचं त्यांनाच माहीत.

चुलत भावांत सरपंच पदासाठी चढाओढसत्ताधारी गटाने सरपंच पदासाठी आनंदा गायकवाड यांना रिंगणात उतरवले आहे. तर विरोधी पँनेलने त्यांचेच चुलत बंधू शंकर गायकवाड यांची उमेदवारी दिल्याने निवडणूकीत रंगत आली आहे. तर शंकर गायकवाड यांचे सख्खे बंधू महादेव गायकवाड हे प्रभाग क्रमांक  ३ मध्ये सत्ताधारी गटाकडून निवडणूक लढवत आहे. 

चुलती- पुतण्यात लढत या निवडणुकीत प्रभाग १ मध्ये तर चुलती व पुतण्या यांच्यात लढत होत आहे. सत्ताधारी गटाचे उमेदवार अर्जुन जाधव यांच्या विरोधात त्यांची चुलती विजया जाधव लढत आहेत. याचीही चर्चा सुरू आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरgram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक