सातारा : उसने दिलेले पैसे परत मागितले म्हणून एकाच्या डोक्यात दगड घालण्यात आला. याप्रकरणी सातारा तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही घटना वडूथ येथे घडली होती.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, याप्रकरणी नीलेश अर्जुन कांबळे (रा.वडूथ, ता. सातारा) यांनी तक्रार दिलेली आहे. या तक्रारीनंतर प्रशांत जयवंत गंगावणे (रा. वाढे, ता. सातारा) याच्याविरोधात गुन्हा नोंद झाला आहे. दि. १७ जून रोजी रात्री आठच्या सुमारास वडूथ येथे हा प्रकार घडला. उसने पैसे मागितल्याने रागाच्या भरात जमिनीवरील पडलेला दगड घेऊन संशयिताने तक्रारदाराच्या डोक्यात मारला. तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ केली. याप्रकरणी सातारा तालुका पोलिस ठाण्यात दुखापतीचा गुन्हा नोंद झाला आहे. हवालदार डोंबाळे हे तपास करीत आहेत.
उसने दिलेले पैसे मागितले, रागात एकाच्या डोक्यात घातला दगड; सातारा तालुका पोलिसांत गुन्हा नोंद
By नितीन काळेल | Updated: June 19, 2023 13:57 IST