शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

Satara: मलकापुरात भरधाव कार भाजी मंडईत घुसली; भाजीविक्रेत्या महिलांना चिरडले, एक ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2026 12:52 IST

तेरा वर्षांच्या मुलीसह दोन महिला गंभीर, भाजी मंडईत भीषण अपघात

मलकापूर (जि.सातारा) : येथील भाजी मंडईत भरधाव कार घुसली. या अपघातात भाजीविक्री करण्यासाठी रस्त्याकडेला बसलेल्या चार महिलांना कारने चिरडले. या अपघातात उषा बाळू रौंदाळे (वय ४७, रा. मलकापूर, कराड) ही महिला ठार, तर तेरा वर्षांच्या मुलीसह इतर दोन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत.मलकापूर-जखिणवाडी रस्त्याकडेला भरलेल्या भाजी मंडईत बुधवारी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातानंतर भरधाव कार कठड्यावर जाऊन अडकली.रूपाली मारुती पाटील (३७, रा. काले), दीपाली सचिन हुलवान (३८), ज्ञानदा सचिन हुलवान (१३, सध्या मलकापूर, मूळगाव येडेमच्छिंद्र) अशी जखमींची नावे आहेत.कोयना वसाहत येथे रस्त्यावरच भाजी मंडई भरते. बुधवारी सायंकाळी सात साडेसातच्या दरम्यान भरधाव वेगात महामार्गाच्या दिशेने निघालेल्या (एमएच ५०-३००१) या कारचालकाचा ताबा सुटल्याने रस्त्याकडेला भाजी विकण्यासाठी बसलेल्या महिलांमध्ये घुसली. या अपघातात भाजीविक्रेत्या चार महिलांना या कारने चिरडले. या अपघातात चिरडलेल्या चारही महिलांना येथील भाजीविक्रेत्यांनी तातडीने उपचारासाठी कृष्णा रुग्णालयात दाखल केले असता एका महिलेचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तर तेरा वर्षांच्या मुलीसह दोन महिलांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. अपघातानंतर ही कार रस्त्यालगत असणाऱ्या फलकाला धडक देत कठड्यावर जाऊन अडकली. संबंधित कार एक महिला चालवत होती, असे घटनास्थळावरील लोकांनी सांगितले.

English
हिंदी सारांश
Web Title : Satara: Car crashes into market, killing one, injuring others.

Web Summary : A speeding car crashed into a vegetable market in Malkapur, Satara, killing a woman and seriously injuring three others, including a 13-year-old girl. The car hit four women selling vegetables by the roadside. The injured are receiving treatment at Krishna Hospital.