दुर्दैवी! रडता-रडताच चिमुकल्याचा गेला जीव, कुटुंबीयांना बसला मानसिक धक्का
By संजय पाटील | Updated: September 26, 2022 18:03 IST2022-09-26T17:56:01+5:302022-09-26T18:03:07+5:30
अरहानच्या जाण्याने हसत्या खेळत्या आंबेकरी कुटुंबाला जबर मानसिक धक्का बसला आहे

दुर्दैवी! रडता-रडताच चिमुकल्याचा गेला जीव, कुटुंबीयांना बसला मानसिक धक्का
संजय पाटील
कऱ्हाड : सहा महिन्यांच्या चिमुकल्याचा रडता-रडता जीव गेल्याची दुर्दैवी घटना कऱ्हाड शहरातील गुरुवार पेठेत घडली. अरहान तोसीफ आंबेकरी (वय ६ महिने, रा. गुरुवार पेठ, कऱ्हाड) असे मृत्यू झालेल्या चिमुकल्याचे नाव आहे. या घटनेमुळे संबंधित कुटुंबाला जबर मानसिक धक्का बसला आहे. काल, रविवारी ही घटना घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, अरहान हा घरात असताना अचानक रडू लागला. त्यानंतर तो बेशुद्ध पडला. घरातल्यांनी त्याला तत्काळ कऱ्हाड येथील एका रुग्णालयात दाखल केले. मात्र, तत्पूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. अरहानच्या जाण्याने हसत्या खेळत्या आंबेकरी कुटुंबाला जबर मानसिक धक्का बसला आहे. त्याचा नेमका कशामुळे मृत्यू झाला, हे अद्याप समोर आले नाही. कृष्णा हाॅस्पिटलचे विकास माने यांनी याबाबत कऱ्हाड शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.