शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
3
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
5
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
6
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
7
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
8
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
9
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
10
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
11
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
12
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
13
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
14
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
15
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
16
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
17
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
18
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
19
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
20
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला

साताऱ्यात तोतया पोलिसांनी निवृत्त तहसीलदाराला गंडवले, साडेचार लाखांचे दागिने हातोहात लांबवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2023 18:34 IST

हिप्नॉटिझम तर नाही ना...?

सातारा : ‘मी क्राइम ब्रँचचा पोलिस असून येथे चोऱ्या हात आहेत, तुमचे दागिने काढून द्या,’ असे म्हणून तोतया क्राइम ब्रँचच्या पोलिसाने चक्क निवृत्त तहसीलदाराला तब्बल साडेचार लाखांना गंडा घातला. ही धक्कादायक घटना गोडोली परिसरात रविवारी सायंकाळी साडेसहा वाजता घडली.शंकरराव तुकाराम मुसळे (वय ८२, रा. साईकृपा गिरिचिंतन काॅलनी, विलासपूर, गोडोली, सातारा) हे सेवानिवृत्त तहसीलदार असून, रविवार, दि. ८ रोजी सायंकाळी ते चालत निघाले होते. गोडोलीतील हाॅटेल समुद्रसमोरील रस्त्यावर आल्यानंतर तेथे दोन युवक आले. त्यापैकी एका तरुणाने ‘मी क्राइम ब्रँचचा पोलिस असून येथे चोऱ्या होत आहेत. तुमचे दागिने काढून द्या,’ असे सांगितले, तर दुसऱ्या तरुणाने हातचलाखी करून मुसळे यांच्या गळ्यातील सोन्याची चेन आणि अंगठ्या स्वत: काढून घेतल्या. हे सर्व दागिने रुमालात बांधून देतो, असे म्हणून त्या तरुणाने रुमालात पेपर व टिश्शूपेपरमध्ये गुंडाळून त्यांच्या हातात दिला. यानंतर दोघेही चोरटे तेथून दुचाकीवरून पसार झाले. काही अंतर पुढे गेल्यानंतर मुसळे यांनी रुमाल उघडून पाहिला असता त्यामध्ये दगड आढळून आला.

आपली फसवणूक झाल्याचे समजताच मुसळे यांनी हा प्रकार घरातल्यांना सांगितला. दुसऱ्या दिवशी सोमवारी सायंकाळी त्यांनी सातारा शहर पोलिस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली. या दोघा चोरट्यांनी तब्बल ४ लाख २० हजार १७० रुपयांचे दागिने हातोहात लांबविल्याचे समोर आले आहे.हिप्नॉटिझम तर नाही ना...?सेवानिवृत्त तहसीलदार मुसळे यांना चोरटे काय बोलताहेत, हे समजत होते. मात्र, त्यांच्या वार्धक्याचा गैरफायदा घेऊन चोरट्यांनी त्यांचे दागिने स्वत:हून काढून घेतले. मुसळे यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी हिप्नाॅटिझम केले असावे. त्यामुळेच त्यांना दागिने चोरता आले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस