सातारा : जागेच्या व्यवहारासाठी ४० लाख दिले असतानाही बांधकाम व्यावसायिकाकडे आणखी २० लाख रुपयांची मागणी केल्याच्या आरोपावरून सातारा शहर पोलिस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल झाला आहे.शंकर दत्तात्रय जाधव (रा. कोडोली, सातारा) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयिताचे नाव आहे. वरद बिल्डर ॲण्ड प्रमोटतर्फे (सातारा) फिर्याद देण्यात आली आहे. फिर्यादीत म्हटले आहे की, संशयिताने फोनवरून व्यवहारासाठी तुम्ही आतापर्यंत ४० लाख रुपये दिले आहेत. त्या बदल्यात मला अजून २० लाख रुपये जादा वाढवून दिले पाहिजेत.
नाहीतर मी आपला करारनाम्याप्रमाणे माझ्या पत्नीला सही करून देणार नाही. असे म्हणून शिवीगाळ करून तुला पोलिस स्टेशनला काय तक्रार करायची ते कर, पोलिस स्टेशन माझे काही करू शकत नाही, असे म्हणून जीवे मारण्याची धमकी दिली. हवालदार गुरव हे अधिक तपास करीत आहेत.
Web Summary : Satara: A case has been registered against Shankar Jadhav for allegedly demanding 2 million rupees from a builder despite receiving 4 million for a land deal. He threatened the builder with dire consequences and refusal to sign the agreement.
Web Summary : सतारा: शंकर जाधव पर एक बिल्डर से जमीन के सौदे के लिए 40 लाख रुपये मिलने के बावजूद 20 लाख रुपये की जबरन वसूली का मामला दर्ज किया गया है। उसने बिल्डर को गंभीर परिणाम और समझौते पर हस्ताक्षर करने से इनकार करने की धमकी दी।