शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
"राहुल गांधींचे सर्व आरोप खोटे आणि निराधार" निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर!
4
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
5
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
6
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
7
१० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
8
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
9
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
10
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
11
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
12
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
13
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
14
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
15
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
16
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
17
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
18
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
19
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
20
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी

महामार्गावर मृतदेह पाहताच चालकाने लेन बदलली, खासगी लक्झरी बस कंटेनरवर आदळली; दोघे जखमी

By प्रशांत कोळी | Updated: September 7, 2022 18:02 IST

बसचालकाने वेळीच बसवर नियंत्रण मिळविल्याने जीवित हानी टळली

खंडाळा : पुणे-बंगळुरू महामार्गावर पारगाव गावचे हद्दीत कंटेनरने अचानक लेन बदलल्याने पाठीमागून रत्नागिरीहून पुण्याकडे जाणारी खासगी लक्झरी बस आदळली. त्यात बसमधील दोन जण किरकोळ जखमी झाले. या अपघातात बसचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. मात्र, चालकाच्या प्रसंगावधान राखल्याने प्रवाशांचे जीव वाचले.याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, साताऱ्याकडून पुणे बाजूकडे जाणाऱ्या मार्गावर बुधवारी पहाटे पाचच्या सुमारास काळ भैरवनाथ मंदिराजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेने निनाद लांडे (वय ४३, रा. डिग्रज, ता. मिरज, जि. सांगली) हा पादचारी जागीच ठार झाला. हा मृतदेह रस्त्याच्या मधोमध पडला होता.यावेळी पुणे बाजूकडे जाणारी वाहने उजव्या बाजूने जात होती. अचानक पुढे मधील लेनमध्ये पडलेला मृतदेह पाहताच कंटेनर (जीजे १५-वायवाय ९११९) च्या चालकाने आपले वाहन उजव्या बाजूला घेतले. यावेळी कंटेनरचा वेग मंदावल्याने तिसऱ्या लेनमधून पाठीमागून येणारी खासगी बस (एमएच ११-सीएच ४७७६) ही कंटेनरवर आदळली. यावेळी बसचालकाने वेळीच बसवर नियंत्रण मिळविल्याने जीवित हानी टळली. मात्र, दुभाजकावर बस धडकल्याने बसचे नुकसान झाले आहे.या अपघाताची माहिती मिळताच खंडाळा पोलीस घटनास्थळी पोहोचले. रस्त्यातील मृतदेह रुग्णवाहिकेतून शवविच्छेदनासाठी पाठविला. तर जखमींना उपचारासाठी दवाखान्यात पाठविण्यात आले. या अपघाताची नोंद खंडाळा पोलीस ठाण्यात झाली आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरAccidentअपघातhighwayमहामार्ग