शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
3
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
4
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
5
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
6
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
7
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
8
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
9
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
10
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
11
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
12
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
13
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
14
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
15
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
16
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
17
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
18
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
19
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
20
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा

Satara: मलकापुरात महामार्गावरील खड्ड्याने घेतला महिलेचा बळी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2024 13:28 IST

महामार्गाच्या कामातील चौथा बळी : अवजड वाहने उपमार्गावर; दोन्ही रस्त्याला भेगा

मलकापूर : मलकापूर (ता. कऱ्हाड) येथील उड्डाणपुलाचे काम सुरू झाल्यापासून अवजड वाहतुकीने उपमार्गाला खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. या खड्ड्यांत अपघात होऊन आतापर्यंत चार जणांचा मृत्यू झाला. शनिवारी झालेल्या अपघातात खड्डा चुकविण्याच्या नादात गाडी घसरून महिलेचा जागीच मृत्यू झाला. त्यामुळे महामार्गावरील खड्ड्याने महिलेचा बळी घेतला, अशी चर्चा परिसरात होती.महामार्गाच्या सहापदरीकरणासह उड्डाणपुलाचे काम सुरू नसल्यामुळे एक वर्षापासून महामार्गावरील वाहतूक दोन्ही बाजूंच्या उपमार्गावरून वळविण्यात आली आहे. अवजड वाहतूक उपमार्गावरून होत असल्याने दोन्ही उपमार्गाला भेगा पडल्या आहेत. कोयना पूल ते नांदलापूर परिसरात ठिकठिकाणी मोठमोठ्या खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे.उड्डाणपुलाचे काम सुरू झाल्यापासून विविध कामांसाठी खोदलेले खड्डे व्यवस्थित न बुजविल्यामुळे सुरुवातीला एका शाळकरी मुलाचा मृत्यू झाला होता. ज्यानंतर काही दिवसांतच खड्ड्यात आपटून दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला होती. त्यानंतर ट्रक-दुचाकी अपघातात एकाचा मृत्यू झाला होत. असे आतापर्यंत वेगवेगळ्या अपघातांत तीन जणांचा मृत्यू झाला होता. शनिवारी पुन्हा एकदा खड्ड्यामुळे दुचाकी घसरून झालेल्या अपघातात महिला जागीच ठार झाली. त्यामुळे महामार्गावर खड्ड्यांनी आतापर्यंत चार बळी घेतले आहेत. सध्या पावसाची रिमझिम सुरू असल्यामुळे दोन्ही बाजूंच्या उपमार्गावर खड्डे दिवसेंदिवस वाढतच जात आहेत. नेमका रस्त्यात खड्डे की खड्ड्यांत रस्ता हे कळेना, अशी अवस्था मलकापुरात झाली आहे. वेळोवेळी हे खड्डे बुजविण्यासाठी संबंधित यंत्रणा तोकडी पडत असे. या खड्ड्यांतून मार्ग काढत असताना अवजड वाहतुकीसह दुचाकीस्वारांना तारेवरची कसरत करावी लागत असे. खड्ड्यांमध्ये वाहने आढळून अनेकांना मणक्याचा त्रास सुरू झाला. तर वाहनांचा मेंटेनन्सही वाढला असल्याचे वाहनधारकांमधून बोलले जात आहे. तरी हे खड्डे बुजविण्यासाठी संबंधित कंत्राटदाराने त्वरित लक्ष घालावे, अशी मागणी वाहनधारकांसह स्थानिक नागरिकांमधून होत आहे.

खड्ड्यांत पाणी.. मणक्याला दणका!नुकत्याच झालेल्या संततधार पावसामुळे उपमार्गावरील खड्ड्यांमध्ये पावसाची पाणी साचत आहे. वाहनधारकांना त्याचा अंदाज न आल्याने अपघात होऊन अनेकजण जायबंदी होत आहेत. अनेकवेळा सायलेन्सरमध्ये पाणी गेल्याने गाड्या बंद पडून गाड्यांचे नुकसान झाले आहे. दररोजच वाहतूक संथगतीने सुरू असते. तर वाहतूक कोंडी होऊन अनेकवेळा चार किलोमीटरपर्यंत रांगांमध्ये वाहनधारकांना अडकून पडावे लागत आहे.

जागोजागची अपुरी कामे जीवघेणी..मलकापुरात सध्या महामार्गाच्या सहापदरीकरणाचे काम सुरू आहे. संबंधित कंत्राटदाराकडून ठिकाणी वेगवेगळी कामे सुरू आहेत. त्या कामात ठिकठिकाणी अपुरे कामे करून तसेच सोडून दुसरीकडेच काम सुरू केले जाते. त्यामुळे अशी अपुरी सोडलेली कामे वाहनधारकांच्या जीवावर बेतत आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरhighwayमहामार्गDeathमृत्यू